Home शहरे मुंबई पतीचा पत्नीच्या चारित्रावर संशय; वादानंतर त्याने रागाच्या भरात…

पतीचा पत्नीच्या चारित्रावर संशय; वादानंतर त्याने रागाच्या भरात…

0
पतीचा पत्नीच्या चारित्रावर संशय; वादानंतर त्याने रागाच्या भरात…

[ad_1]

म. टा. खास प्रतिनिधी

कांदिवली : चारित्र्याच्या संशयावरून पतीने केल्याची घटना शनिवारी रात्री कांदिवलीच्या पोयसर भागामध्ये घडली. याप्रकरणी कुरार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून महिलेचा पती महेश सोनी याला अटक केली आहे.

पोयसर भागात महेश सोनी हे पत्नी आणि मुलांसोबत वास्तव्यास आहेत. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय महेश सोनी यांना होता. यावरून दोघांमध्ये वारंवार भांडण व्हायचे. याच कारणावरून महेश पत्नीला मारहाणदेखील करायचा. शनिवारी रात्री यावरूनच दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात महेशने घरातील चाकूने पत्नीची हत्या केली. याबाबतची माहिती मुलांनी देताच कुरार पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि महेशला अटक केली.

[ad_2]

Source link