Home मनोरंजन ‘कबीर सिंह’चं वादळ थांबता थांबेना ! आठवडयाभरात ‘या’ मोठया अभिनेत्यांच्या सिनेमांना टाकलं मागे

‘कबीर सिंह’चं वादळ थांबता थांबेना ! आठवडयाभरात ‘या’ मोठया अभिनेत्यांच्या सिनेमांना टाकलं मागे

मुंबई :  शाहिद कपूरचा रोमँटीक ड्रामा असलेला कबीर सिंह सिनेमाचं वादळ बॉक्स ऑफिसवर थांबण्याचं नाव घेत नाही. अवघ्या ६ दिवसाच्या कलेक्शनमध्ये कबीर सिंहने २०१९ मधील अनेक मोठ्या रिलीजला मागे टाकले आहे. ट्रेड अॅनॅलिस्ट तरण आदर्शने कबीर सिंहच्या कमाईचे लेटेस्ट आकडे शेअर करत सांगितले आहे की, सिनेमाने ६ दिवसात १२०.८१ कोटींची कमाई केली आहे. तरण आदर्शने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘कबीर सिंह बॉक्स ऑफिसवर मजबूतीने टिकून आहे. विकडेजमध्येही सिनेमाची कमाई थांबण्याचं नाव घेत नाही असं दिसत आहे. कबीर सिंहने सर्व सिनेमांच्या कमाईवर ग्रहण लावलं आहे. शुक्रवारी या सिनेमाने २०.२१ कोटी, शनिवारी २२.७१ कोटी, रविवारी २७.९१, सोमवारी १७.५४ कोटी, मंगळवारी १६.५३ कोटी बुधवारी १५.९१कोटी कमावले आहे. भारतीय बाजारात या सिनेमाचं एकूण कलेक्शन १२०.८१ कोटी झालं आहे.

केसरी आणि टोटल धमाल सिनेमांना टाकले मागे

या वर्षी रिलीज झालेल्या अक्षय कुमार, अजय देवगन, रणवीर सिंग यांच्या सिनेमांच्या एका आठवड्याच्या कमाईच्या तुलनेत कबीर सिंहने जास्त कमाई केली आहे. कबीर सिंहने जिथे ६ दिवसात १२०.८१ कोटी कमावले आहेत तिथे केसरीने ८ दिवसात १०६.८६, गली बॉयने ८ दिवसात १००.३० कोटी, टोटल धमालने ७ दिवसात ९४.५५ कोटी कमावले होते.

निगेटीव प्रतिक्रियांचा सिनेमालाच फायदा

कबीर सिंहला घेऊन सर्वत्र चर्चा होत आहे विशेष करून तरुणांमध्ये याबाबत बोललं जाताना दिसत आहे. या सिनेमासाठी आलेल्या पॉजिटीव तसेच निगेटीव कमेंट या सिनेमाला आणखी वेग देताना दिसत आहे. सोसायटीमधील एक सेक्शन कबीर सिंहवर मजबूत टीका करताना दिसत आहे. हा सिनेमा नारी द्वेषाने भरपूर आहे असं सांगितलं जात आहे. परंतु या प्रकारची निगेटीव प्रतिक्रिया शाहिदच्या कबीर सिंह सिनेमासाठी फायदेशीर ठरताना दिसत आहे.