हायलाइट्स:
- विनोदी अभिनेत्री सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले यांचे लग्न
- लग्नानंतर नवीन घरी झाली सत्यनारायणाची पूजा
- लग्नानंतर सुगंधाने सासरच्यांसाठी केले खास गोड पदार्थ
नवदांपत्याने परिधान केला पारंपरिक पोशाख
दोघांच्या नवीन घरी सत्यनारायणाच्या पूजेवेळी सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसलेने पारंपरिक महाराष्ट्रीयन पोशाखात दिसले. पूजाने नऊवारी साडी, नथ आणि केसांमध्ये गजरा माळला होता. तर संकेतने कुर्ता आणि पायजमा परिधान केला होता. याबद्दल सुगंधाने सांगितले, ‘लग्नानंतर आता मी महाराष्ट्रीयन पद्धती समजून घेत आहे. मी महाराष्ट्रीयन पत्नी होण्यासाठी खूपच उत्सुक आहे.’

सासरच्या मंडळींसाठी केला खास पदार्थ
सुगंधाने आपल्या सासरच्या मंडळींसाटी पंजीरी हा गोड पदार्थ बनवला होता. सुगंधाने सांगितले, ‘हा एक पारंपरिक पंजाबी मिठाई आहे. ही मिठाई खास पूजेच्यावेळी पंजाबी घरांमध्ये बनवली जाते. याशिवाय मी एक पारंपरिक महाराष्ट्रीयन गोड पदार्थही केला आहे. या दोन्ही पदार्थांचा आस्वाद आम्ही सगळ्यांनी घेतला.’ संकेत भोसलने सांगितले, ‘आता मी एका नव्या भूमिकेत शिरलो असून जबाबदार पती होण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. तसे वचन मी सुगंधाला दिले आहे.’
लग्नाबद्दल हे म्हणाला होता संकेत
लग्नाबाबत संकेतने सांगितले होते, ‘ लग्न होणे हे अद्भूत आणि एक सुंदर अशी भावना आहे. माझे लग्न सुगंधासोबत झाले आहे हे माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. लग्न झाल्यानंतर मला अचानक खूप जबाबदार झाल्या सारखे वाटत आहे. मी खूप आनंदात आहे. मुंबईत आल्यानंतर काही धार्मिक कार्यक्रमात आम्ही दोघेही व्यग्र आहोत…’
