[ad_1]
हायलाइट्स:
- अजित पवारांनी मध्यरात्रीच केला रोहित पाटलांना फोन
- ऑक्सिजन टँकर पाठवल्याची दिली माहिती
- अजित पवारांचा फोन आल्यानंतर रोहित पाटलांची धावपळ
‘ऑक्सिजन टँकर पाठवला आहे…तू स्वत: थांबून तो उतरवून घे,’ असं अजित पवारांनी रोहित पाटील यांना सांगितलं. थेट अजित पवारांकडूनच सूचना आल्याने रोहित पाटील हे मध्यरात्री साडेबारा वाजताच सदर ठिकाणी दाखल झाले आणि ज्या रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा संपत आला होता, तिथे तो पोहोचवण्यात मदत केली. शनिवारी मध्यरात्री ही संपूर्ण घटना घडली.
‘रात्री उशिरा १२.३० वाजता तासगाव आणि कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालातील ऑक्सिजन सिलिंडर संपल्याचे कळाले. तत्काळ सांगली येथे जाऊन ऑक्सिजन प्लांट येथे भेट देऊन ऑक्सिजन उपलब्ध करून घेतले. मी तेथील सर्व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला, लोकांना सुविधा देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत आम्ही सर्वजण त्यांचे ऋणी आहोत,’ अशी माहिती रोहित पवार यांनी दिली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील इतर भागांप्रमाणेच सांगली जिल्ह्यातही करोना व्हायरसने थैमान घातलं आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. परिणामी आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. यातून मार्ग काढण्याचं मोठं आव्हान लोकप्रतिनिधी आणि प्रशासनासमोर आहे.
[ad_2]
Source link