हायलाइट्स:
- मुख्यमंत्र्यांना विधानसभा किंवा विधानपरिषदेचं सदस्यत्व गरजेचं
- मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांत सदस्यत्व मिळवणं गरजेचं
- ममता बॅनर्जी कसा सोडवणार हा पेच?
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला २१३ तर भाजपला ७७ जागांवर विजय मिळालाय. असं असलं तरी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागलाय. त्यामुळे आता त्या मुख्यमंत्रीपदी कशा विराजमान होणार? या प्रश्नावर ममतांना उत्तर शोधावं लागणार आहे.
वाचा : विधानसभा निवडणूक २०२१ : कोण जिंकलं? कोण पराभूत? चर्चित चेहरे
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील नंदीग्राम मतदारसंघात मुख्यमंत्री – तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार ममता बॅनर्जी यांचा त्यांचेच एकेकाळचे सहकारी – भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी तब्बल १७३६ मतांनी पराभव केलाय.
ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्यासाठी विधानसभा किंवा विधान परिषद (राज्यातील वरिष्ठ आणि कनिष्ठ सभागृह) या दोहोंपैंकी एकाचं सदस्यत्व मिळवणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री शपथ घेताना दोन्ही सभागृहांपैंकी एकाही सभागृहाचे सदस्य नसतील, तर शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीत त्यांनी कोणत्याही एका सभागृहाचं सदस्यत्व मिळवणं गरजेचं आहे. यात मुख्यमंत्र्यांना अपयश आलं तर त्यांना मुख्यमंत्र्यांना सहा महिन्यातच पद सोडावं लागू शकतं.