Home शहरे मुंबई पालघरमध्ये करोना उपचार ट्रेन दाखल

पालघरमध्ये करोना उपचार ट्रेन दाखल

0
पालघरमध्ये करोना उपचार ट्रेन दाखल

[ad_1]

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

करोना संकटाशी सामना करताना ऑक्सिजन बेडची वाढती मागणी लक्षात घेता रेल्वेने तयार केलेली आयसोलेशन डब्यांची ट्रेन पालघरमध्ये दाखल झाली आहे. या गाडीत ३७० करोनाबाधितांवर उपचार करणे शक्य होणार आहे. पालघर जिल्ह्यात करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून स्थानिक प्रशासनाकडे असलेल्या आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. बेडची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने पालघर जिल्ह्यासाठी रेल्वेचे आसयोलेशन डबे उपलब्ध करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली होती.

पश्चिम रेल्वेने २३ डब्यांची ही ट्रेन पालघर स्थानकात रवाना केली. विना वातानुकूलित प्रकारातील ही गाडी आहे. रुग्णांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था या गाडीतच आहे. एका डब्यात १६ रुग्णांवर उपचार करण्यात येणार असून या डब्यांमध्ये ऑक्सिजन बेडचीदेखील सुविधा उपलब्ध आहे. डॉक्टरांसाठी आणि वैद्यकीय साधने ठेवण्यासाठी स्वतंत्र डबा राखीव ठेवण्यात आला आहे. रेल्वे आयसोलेशन डब्यांसाठी पश्चिम रेल्वे आणि पालघर जिल्हाधिकारी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

उन्हाळ्याच्या काळात तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी डब्यांचे छत तसेच खिडक्यांमध्ये कूलरची सुविधा पुरवण्यात आली आहे. प्रत्येक डब्यात पाणी व विजेची सोय करण्यात आली आहे. नंदुरबार, नागपूरनंतर (अजनी) आता पालघरमध्ये ही सुविधा देण्यात आली आहे.

२४ तास रुग्णवाहिका

रुग्णाची लक्षणे/परिस्थिती बिघडू लागल्यास रुग्णांना तातडीने उच्च केंद्रात म्हणजेच समर्पित कोविड रुग्णालयात स्थलांतरित करण्यासाठी या डब्यांजवळ २४ तास रुग्णवाहिका उपलब्ध असेल. मनपाने नेमलेले वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टर आणि कर्मचारी या रुग्णांना सेवा देणार आहेत. जैव-वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नियुक्त केलेल्या एजन्सीकडून राज्य सरकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित प्रक्रिया केली जाईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

[ad_2]

Source link