[ad_1]
मुंबई: करोना व्हायरसमुळे मनोरंजन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. अनेक चित्रपट शूटिंग पूर्ण होऊनही ते रिलीज होऊ शकलेले नाहीत. पण असं असलं तरीही लॉकडाऊनच्या काळातही ओटीटी प्लॅटफॉर्मवर मात्र मनोरंजनाचा धमाका होणार आहे. अभिनेत्री नीना कुलकर्णी यांचा ‘फोटो प्रेम‘ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.
हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत्या ७ मे ला रिलीज होणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य राठी यांनी केलं असून नीना कुलकर्णी यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात अमिता खोपकर, विकास हांडे, चैत्राली रोडे, समीर धर्माधिकारी, समय संजीव तांबे, अश्विनी मुकादम, विठ्ठल गांवकर आणि निलकंठ सावंत यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
[ad_2]
Source link