हायलाइट्स:
- ठाकरे सरकारवर मनसेची जोरदार टीका
- मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याचा आक्षेप
- मनसेच्या टीकेला शिवसेना काय उत्तर देणार?
‘लसीकरण आहे, पण लस नाही. खाटा आहेत, पण ऑक्सिजन नाही. उपचार आहे, पण औषध नाही. व्यापारी आहे, पण व्यापार नाही. लोक आहेत, पण नोकरी नाही. मन की बात आहे, पण मनातलं नाही. मुख्यमंत्री आहेत, पण रस्त्यावर नाहीत. सगळंच रामभरोसे आहे, पण त्यात काहीच राम नाही,’ असं ट्वीट करत संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.
करोना काळातील राज्य सरकारच्या कारभारावर मनसेकडून सातत्याने टीकास्त्र सोडण्यात येत आहे. त्यामुळे मनसेच्या या टीकेला शिवसेनेकडून काय उत्तर देण्यात येतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीही मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केंद्र आणि राज्य सरकारमधील वादावर नाराजी व्यक्त केली होती. ‘जुनी म्हण आहे… भीक नको पण कुत्र आवर. आता म्हणावंस वाटतंय की लस नको पण भांडण आवर. केंद्र आणि राज्याच्या ब्लेम गेममध्ये जनतेचाच गेम होतोय. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे फक्त गाण्यातच म्हणायचं की तशी धमक महाराष्ट्र सरकार दाखवणार आहे,’ असं वक्तव्य संदीप देशपांडे यांनी केलं होतं.