Home मनोरंजन ‘विश्वासघातकी’ म्हणत युझरनं सोनू सूदला केलं ट्रोल, कंगना रणौतने लाइक केलं ट्वीट

‘विश्वासघातकी’ म्हणत युझरनं सोनू सूदला केलं ट्रोल, कंगना रणौतने लाइक केलं ट्वीट

0
‘विश्वासघातकी’ म्हणत युझरनं सोनू सूदला केलं ट्रोल, कंगना रणौतने लाइक केलं ट्वीट

[ad_1]

हायलाइट्स:

  • करोना काळात सातत्यानं गरजूंची मदत करत आहे अभिनेता सोनू सूद
  • सोनू सूदला विश्वासघातकी म्हणत युझरनं केलं ट्रोल करण्याचा प्रयत्न
  • सोनू सूदला विश्वासघातकी म्हणणाऱ्या युझरचं ट्वीट कंगनानं केलं लाइक

मुंबई: सध्या संपूर्ण देश करोना व्हायरसशी लढा देत आहे. या व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. अशात दिवसेंदिवस वाढत्या रुग्ण संख्येमुळे रुग्णालयात बेड, ऑक्सिजन सिलेंडर, इंजेक्शन यांचा तुटवडा होताना दिसत आहे. यासाठी अनेक बॉलिवूड कलाकारांनी लोकांना मदतीचा हात दिला आहे. यामध्ये सोनू सूदचं नाव सर्वात आधी घेतलं जातं कारण तो मागच्या वर्षभरापासून करोनाच्या कठीण काळात लोकांना मदत करताना दिसत आहे. पण असं असतानाही एका युझरनं सोनू सूदला विश्वासघातकी म्हणत ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.

एका युझरनं ट्विटरवर एका जाहीरातीचा फोटो शेअर करत ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यानं सोनू सूदला विश्वासघातकी आणि खोटारडा असं म्हटलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये या युझरनं लिहिलं, ‘ज्या लोकांचे नातेवाईक आणि जवळच्या व्यक्ती मरत आहेत. त्यांचा तू विश्वासघात करत आहेस, १० लिटरच्या ऑक्सिजन कन्सन्ट्रेटरची किंमत १ लाख नसते आणि तू ५ लिटरसाठी २ लाख घेत आहे. असा खोटेपणा आणि विश्वासघात करून तुम्ही रात्री शांत कसे झोपू शकता.’

या युझरचं ट्वीट सोशल मीडियावर आतापर्यंत जवळपास अडीच हजार लोकांनी लाइक केलं आहे तर ७०० पेक्षा जास्त लोकांनी ते रिट्वीट केलं आहे. अनेक युझर्सनी यावर कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि विशेष म्हणजे सोनू सूदला विश्वासघातकी आणि खोटारडा म्हणणाऱ्या या युझरचं ट्वीट अभिनेत्री कंगना रणौतनं लाइक केलं आहे.

AssignmentImage-2071776646-1620104419

कंगना रणौत सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सामाजिक आणि राजकीय मुद्द्यावर ती नेहमीच बिनधास्तपणे आपली मतं मांडताना दिसते. देशात करोनावर तर तो सातत्यानं बोलताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच कंगनानं एक ट्वीट केलं होतं. ज्यात तिनं, ‘जेव्हा भारत संकटात असतो, त्यावेळी इतर देश त्याच्या विरोधात गँग तयार करतात’ असं म्हटलं होतं. ज्यावरून तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं.

दरम्यान एकीकडे सोशल मीडियावर काही लोक सोनू सूदला विश्वासघातकी म्हणत त्याच्यावर टीका करत आहेत. तर दुसरीकडे अनेक युझर्सचं म्हणणं आहे की, अशाप्रकारच्या जाहीरात सोनू सूदच्या नावाचा वापर करून फ्रॉड केला जात आहे हे सोनू सूदलाही माहीत नसेल. त्यामुळे अशा गोष्टींवर विश्वास ठेऊ नये.

[ad_2]

Source link