Home बातम्या राष्ट्रीय गोकुळ निवडणूकः सतेज पाटलांचे चार उमेदवार विजयी; सत्ताधारी गटाचे टेन्शन वाढले

गोकुळ निवडणूकः सतेज पाटलांचे चार उमेदवार विजयी; सत्ताधारी गटाचे टेन्शन वाढले

0
गोकुळ निवडणूकः सतेज पाटलांचे चार उमेदवार विजयी; सत्ताधारी गटाचे टेन्शन वाढले

कोल्हापूरः जिल्ह्यातील राजकारणाचे भवितव्य ठरविणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. सत्तारुढ राजर्षी शाहू आघाडी व विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडी यांच्यामध्ये थेट लढत झाली होती. अद्याप मतमोजणी सुरु असून आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालामध्ये सतेज पाटील यांच्या गटाचे चार उमेदवार विजयी झाले आहेत.

गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीसाठी २१ जागासाठी ४५ उमेदवार रिंगणात होते. जिल्ह्यातील ७० मतदान केंद्रावर मतदान झाले. जिल्ह्यातील मातब्बर मंडळींचे वारसदार गोकुळच्या निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. आघाडीचे नेते आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी खासदार धनंजय महाडिक आणि विरोधी आघाडीकडून पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या चुरस पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या पहिल्या फेरीत विरोधी शाहु आघाडीचे पाचही उमेदवार आघाडीवर होते. तर, दुसऱ्या फेरीत सतेज पाटील यांच्या विरोधी आघाडीचे सुजित मिणचेकर, बयाजी शेळके व अमरसिंह पाटील, अंजना रेडकर विजयी झाले आहेत.

दरम्यान, आत्तापर्यंत जाहीर झालेल्या पाच जागांच्या निकालानुसार सत्ताधारी गटाच्या शौमिका महाडिक यांनी विजय मिळवला आहे. महाडिक कुटुंबातील उमेदवार विजयी झाल्यानं जल्लोष व्यक्त केला जात आहे. शौमिका यांना पहिल्यांदाच उमेदवारी देण्यात आली होती.

Source link