Home मनोरंजन इंडियाज बेस्ट डान्सरचे दुसरे पर्व लवकरच होणार सुरू; देता येणार घरबसल्या ऑडिशन

इंडियाज बेस्ट डान्सरचे दुसरे पर्व लवकरच होणार सुरू; देता येणार घरबसल्या ऑडिशन

0
इंडियाज बेस्ट डान्सरचे दुसरे पर्व लवकरच  होणार सुरू;  देता येणार घरबसल्या ऑडिशन

[ad_1]

मुंबई : करोना काळात प्रत्येकजण घरात अडकून पडला आहे. तुम्हांला जर नृत्याची आवड असेल तर या मोकळ्या वेळेचा तुम्ही नक्कीच सदुपयोग करू शकता इतकेच नाही तर यातून तुमचे करीअरही घडू शकते. विश्वास नाही ना बसत तुमचा पण हे खरेच आहे. कारण सोनी वाहिनीने त्यांच्या डान्स शो ‘इंडियाज बेस्ट डान्सर पर्व २’ कार्यक्रम प्रसारित करण्याचा निर्णय सोनी टिव्हीने घेतला आहे. या कार्यक्रमासाठी ऑनलाईन ऑडिशन घेत असल्याचे सोनी टिव्हीने जाहीर केले आहे. या ऑडिशनमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना घरातल्या घरात दोन डान्स करायचे असून ते व्हिडीओ रेकॉर्ड करून वाहिनीच्या सोनी लिव अॅपवर अपलोड करायचे आहेत.

‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील सर्वोत्तम डान्सरचा शोध पुन्हा सुरू झाला आहे. पहिल्या सत्राला डान्सप्रेमींकडून भरपूर प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे इंडियाज बेस्ट डान्सरचे दुसरे सत्र घेऊन येण्याचा निर्णय सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने घेतला आहे.

इंडियाज बेस्ट डान्सरचे पहिले सत्र यशस्वी ठरले होते आणि देशातील अगदी काना-कोपर्‍यातून या मंचावर आलेल्या प्रतिभावंतांमुळे आणि त्यांच्या वैविध्यपूर्ण सादरीकरणामुळे हा कार्यक्रम इतरांपेक्षा हटके ठरला होता. या कार्यक्रमात सहभागी स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरस रंगली होती. प्रत्येक स्पर्धकावर परीक्षकांचेही बारीक लक्ष होते त्यामुळे स्पर्धकांची चांगली प्रगती झाली होती.

या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रातल्या स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. स्पर्धकांचा आणि प्रेक्षकांचा हा प्रतिसाद पाहून वाहिनीने हा कार्यक्रम पन्हा एकदा आणण्याचा निर्णय घेतला आहे.

यावर्षी असलेले करोनाच्या संकटामुळे सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने इंडियाज बेस्ट डान्सर सत्र २ साठी डिजिटल ऑडिशन्स घेण्याचे ठरवले आहे. सोनी लिव अॅपच्या माध्यमातून या ऑडिशन्सना ५ मे पासून सुरुवात होणार आहे. १४ ते ३० या वयोगटातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. त्यासाठी सोनी लिव अॅपवरून नोंदणी पत्रक त्यांना डाऊनलोड करून भरवे लागणार आहे. त्यानंतर घरातूनच आपल्या डान्सचे दोन व्हिडिओ सोनी लिव अॅपवर अपलोड करू शकतात. या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून टेरेंस लुईस, मलायका अरोरा आणि गीता कपूर काम करणार आहेत.

इंडियाज बेस्ट डान्सरचे पर्व २ लवकरच

कार्यक्रमासाठी ऑनलाइन ऑडिशन घेणार

घरबसल्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी

[ad_2]

Source link