हायलाइट्स:
- अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील शेतकरी रामदास मोतीराम थारकर याची मुलगी प्रियंका थारकर (सदार) यांनी वयाच्या ३५ व्या वर्षी कॅन्सर या रोगावर संशोधन केले आहे.
- कर्करोगाच्या औषधोपचारादरम्यान निरोगी पेशी कशा प्रकारे वाचवता येतील यावर प्रियंका यांनी संशोधन केले आहे.
- या विषयात प्रियंका यांना ऑस्ट्रेलियाची राजधानी सिडनी येथील विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली.
प्रियंका थारकर (सदार) यांचे एमफार्मपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्या अकोला येथीस महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून काम करू लागल्या. त्यानंतर लग्न होऊन काही दिवसांनी त्या न्यूझीलंड येथे गेल्या. तेथे सन २०१२ मध्ये न्युझीलंड येथील ऑकलंड विद्यापीठात त्यांनी संशोधनाला सुरुवात केली. सन २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाची राजधानी सिडनी येथे त्यांनी पीएचडी केली. त्यानंतर ऑस्ट्रेलिया सरकारने त्यांना स्कुल ऑफ फार्मसीची स्कॉलरशीप दिली. तसेच सिडनी येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत निमंत्रित गेस्ट स्पीकर म्हणून त्यांना पाचारण करण्यात आले.
क्लिक करा आणि वाचा- पुणेकरांसाठी चांगली बातमी; ऑक्सिजनचा पुरवठा नियंत्रणात
प्रियंका थारकर यांचा संशोधनाचा विषय कर्करोगाशी संबंधित आहे. विशेष म्हणजे प्रियंकांनी यावर संशोधन करुन कर्करोगात निरोगीपेशी कशा प्रकारे वाचवता येतील यावर संशोधन केले आहे.
क्लिक करा आणि वाचा- अकोल्यात आतापर्यंत ४६ रेमडेसिवीरचा काळाबाजार उघड, १९ जण अटकेत
क्लिक करा आणि वाचा- गोकुळ मध्ये सत्तांतर; विरोधी आघाडीने उडवला सत्ताधाऱ्यांचा धुव्वा