Home बातम्या राष्ट्रीय Sindhudurg Janta Curfew सिंधुदुर्ग: ‘या’ ३ तालुक्यांत उद्यापासून १० दिवस जनता कर्फ्यू; आंबा विक्रीबाबत महत्त्वाचा निर्णय

Sindhudurg Janta Curfew सिंधुदुर्ग: ‘या’ ३ तालुक्यांत उद्यापासून १० दिवस जनता कर्फ्यू; आंबा विक्रीबाबत महत्त्वाचा निर्णय

0
Sindhudurg Janta Curfew सिंधुदुर्ग: ‘या’ ३ तालुक्यांत उद्यापासून १० दिवस जनता कर्फ्यू; आंबा विक्रीबाबत महत्त्वाचा निर्णय

हायलाइट्स:

  • सिंधुदुर्गात मंगळवारी ५७३ नवीन रुग्णांची नोंद.
  • तीन तालुक्यात १० दिवस जनता कर्फ्यूचा निर्णय
  • आंब्याच्या विक्रीसाठी स्वतंत्र व्यवस्था करणार.

सिंधुदुर्ग: तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून मंगळवारी जिल्ह्यात ५७३ नवीन रुग्णांची भर पडल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. करोनाचा वाढता धोका लक्षात घेत कणकवली तालुक्यापाठोपाठ सावंतवाडी, दोडामार्ग आणि कुडाळ या तीन तालुक्यांतही ६ मे पासून १५ मेपर्यंत जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनता कर्फ्यूदरम्यान औषध दुकाने सुरू राहणार असून दूध विक्री सकाळी ६ ते ९ या वेळेत करता येणार आहे. बाकी सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ( Sindhudurg Janta Curfew Latest News )

वाचा: मोठी बातमी: मुंबईत रिकव्हरी रेट ९० टक्के; आज २,५५४ नवे करोना बाधित

जनता कर्फ्यूसाठी माजी गृहराज्यमंत्री आणि सावंतवाडीचे विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी पुढाकार घेतला असून भाजपचे नगराध्यक्ष संजू परब यांनी यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी त्यास पाठिंबा दिला आहे. सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात दीपक केसरकर आणि प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शहरात १० दिवस जनता कर्फ्यू लावण्याबाबत सर्वांचे एकमत होऊन तसा निर्णय घेण्यात आला. यावेळी शहरातील सर्व पक्षाचे लोक प्रतिनिधी, पोलीस निरीक्षक शशिकांत खोत, तहसीलदार राजाराम म्हात्रे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम पाटील, सावंतवाडीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी साळुंखे, शहरातील प्रमुख व्यापारी उपस्थित होते. यावेळी ६ मे पासून १५ मे पर्यंत सावंतवाडी शहर व तालुक्यात जनता कर्फ्यू लावण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या जनता कर्फ्यूला सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहनही करण्यात आले. जनता कर्फ्यूच्या कालावधीत शहरात कडक बंद असणार असून तालुक्यातही बंद पाळायचा आहे, असे रोहिणी साळुंखे यांनी सांगितले. बंद काळात औषध दुकाने सुरू राहणार आहेत.

वाचा: करोनाची दुसरी लाट ओसरतेय!; ‘या’ जिल्ह्यात रिकव्हरी रेट ९० टक्क्यांवर

सध्या आंब्याचा हंगाम सुरू आहे. हा माल नाशवंत असून या मालाचा उठाव होण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी बुधवारपर्यंत अवजारे, बियाणी यांची खरेदी करावी. कर्फ्यू काळात चिकन, मासे विक्री बंद राहणार आहे. तालुक्यातील गरीब लोकांची यादी तहसीलदार बनवत आहेत. गरिबांसाठी शिव भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. या काळात दुधाचे वितरण सकाळी सहा ते नऊ या वेळेत करता येईल ,असे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. सावंतवाडीसोबतच दोडामार्ग आणि कुडाळ या लगतच्या तालुक्यांतही ६ ते १५ मे पर्यंत जनता कर्फ्यू असणार आहे.

वाचा: अँटिलिया स्फोटकं प्रकरण: देशमुख यांचा परमबीर यांच्यावर गंभीर आरोप

Source link