हायलाइट्स:
- अभिनेत्री रुचिता जाधव विवाहबद्ध
- पाचगणीला झाला लग्नसमारंभ
- संगीत कार्यक्रम रद्द करून गरजूंना केले धान्यवाटप
‘बंगल्यामध्ये तीन दिवस विवाह सोहळा पार पडला. पहिल्या दिवशी साखरपुडा आणि मेहंदीचा कार्यक्रम झाला. २०१३ मध्ये एक अंगठी मला खूप आवडली होती. त्याची माहिती माझ्या मैत्रिणींनी आनंदला दिली आणि त्याने अगदी तशीच अंगठी माझ्यासाठी तयार करून घेतली. ही गोष्ट माझ्यासाठी नक्कीच खास होती. खरे तर या बंगल्याच्या बाहेरच्या आवारात लग्नसोहळा होणार होता. परंतु अचानक पाऊस आल्यामुळे हा कार्यक्रम आम्हाला आतमध्ये करावा लागला.’
रुचिता आणि आनंदच्या लग्नसोहळ्यामध्ये संगीत कार्यक्रम देखील होणार होता. परंतु त्यांनी हा कार्यक्रम रद्द केला. त्याऐवजी त्यांनी डाळ आणि तांदुळाची १५०० पाकीटे पाचगणीच्या परिसरात असलेल्या खेड्यांमध्ये वाटली. त्याबाबत रुचिताने सांगितले, ‘ किमान इतकी तरी मदत आम्ही नक्कीच करू शकणार होतो. त्यामुळे आम्ही या गावात जाऊन प्रत्येक व्यक्तीला अडीच किलो तांदूळ आणि अडीच किलो डाळ वाटली. अशा प्रकारे आम्ही आमचा संगीत सोहळा साजरा केला.’