हायलाइट्स:
- अली गोनीच्या आई, बहिण आणि भाच्यांना करोना
- गेल्या नऊ दिवसांपासून करोनाशी लढा सुरू
- सर्वांनी स्वतःची काळजी घेण्याचे अलीने केले आवाहन
अलीने लिहिले की, ‘एखाद्या व्यक्तीला करोना झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांना नेमके काय वाटत असेल,याची जाणीव मला झाली आहे. माझ्या कुटुंबातील बहुतांश सदस्य हे गेल्या नऊ दिवसांपासून करोनाशी लढत आहेत. यामध्ये माझी आई, बहीण आणि तिची लहान मुले आहेत. हे सर्वजण मोठ्या धीराने करोनाविरुद्ध लढत आहेत. विशेष करून माझे लहान भाचे ज्या पद्धतीने हे सगळे सहन करत आहेत. अल्लाह त्यांच्यावर दया कर. त्यांची काळजी घे.’
मनोज बाजपेयींच्या ‘द फॅमिली मॅन २’ ची रिलीज डेट आली समोर
दरम्यान, याआधी अली गोनीने ३० एप्रिल रोजी स्वतःची करोना टेस्ट केली होती. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्याचवेळी अली गोनीने एक ट्वीट करत लोकांना आवाहन केले होते की, करोनाची थोडी जरी लक्षणे जाणवू लागली तरी लगेचच टेस्ट करून घ्या. त्याने पुढे लिहिले की, माझी टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर मी निवांत झालो आहे. तुम्हा सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल खूप आभार आणि प्लीज तुम्ही स्वतः ची काळजी घ्या. जराजरी लक्षणे जाणवली तरी लगेचच टेस्ट करून घ्या.
अभिनेत्री रुचिता जाधवचं शुभमंगल! लग्नातही जपलं सामाजिक भान
दरम्यान, अली गोनीने त्याच्या भाच्यांचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे. या फोटोंसोबत भावूक नोट लिहिली आहे. त्यात तो लिहितो, ‘माझी लढवय्यी मुले… तुम्हांला जवळ घेऊन खूप सारे प्रेम देण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. आता तुमचा अजून दुरावा मला सहन होत नाही.’