‘रेमेडेसिव्हिर’चा तुटवडा असल्याने वसंतराव पिसाळ आणि सुचेता केसरकर दोन्ही रुग्णांना आयसीएमआर गाइडलाइननुसार रक्त पातळ होण्याची औषधे दिली. या दोन्ही रुग्णांना अँटीफंगल ट्रीटमेंटही देण्यात आली. या दोन्ही उपचारांमुळे हे रुग्ण करोनामुक्त झाले.
– डॉ. सुनील जगताप, साईस्नेह कोव्हिड सेंटर, कात्रज
समुपदेशन सुविधा उपलब्ध
‘कोव्हिड सेंटरमध्ये रुग्ण दाखल झाल्यावर नातेवाइकांना पुरेशी माहिती मिळत नाही. नातेवाइकांना रुग्णाच्या प्रगतीची माहिती देण्याची, समुपदेशनाची सुविधा आम्ही उपलब्ध करून दिली आहे,’ अशी माहिती डॉ. सुनील जगताप यांनी सांगितले.