Home मनोरंजन ‘लहान असताना खेळण्यांऐवजी हातात माईक दिला’, नेहा कक्करनं सांगितल्या स्ट्रगलच्या आठवणी

‘लहान असताना खेळण्यांऐवजी हातात माईक दिला’, नेहा कक्करनं सांगितल्या स्ट्रगलच्या आठवणी

0
‘लहान असताना खेळण्यांऐवजी हातात माईक दिला’, नेहा कक्करनं सांगितल्या स्ट्रगलच्या आठवणी

[ad_1]

हायलाइट्स:

  • नेहा कक्करने शेअर केला लहानपणीचा फोटो
  • फोटो सोबत लिहिली एक भावूक पोस्ट
  • ही पोस्ट वाचून तिच्या नवऱ्यानेही केले तिचे कौतुक

मुंबई : नेहा कक्कर आजच्या काळातील एक उत्तम गायिका म्हणून ओळखली जाते. तिची अनेक गाणी लोकप्रिय आहेत. नेहा सोशल मीडियावरही चांगलीच सक्रीय असते. नेहा तिच्या आयुष्यातील काही खास क्षण फोटो, व्हिडीओ आपल्या चाहत्यांसोबत सातत्याने शेअर करत असते. नुकताच नेहाने तिच्या सोशल मीडियावर तिच्या लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिचा भाऊ आणि वडील दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने एक भावुक पोस्टही लिहिली आहे.

कंगनाची टिवटिव बंद झाल्याने बॉलिवूड कलाकार भलतेच खुश, म्हणाले

काय लिहिले आहे नेहाने…

नेहाने सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहेत. यातील दुसऱ्या फोटोत ती एका वेगळ्याच अंदाजात दिसत आहे. हे फोटो शेअर करताना तिने लिहिले, ‘हा फोटो पाहून तुम्हाला कळले असेल की मी किती लहान होते तेव्हापासून गाणं गायला सुरुवात केली आहे. आई बाबांच्या पुढे टोनी दादा बसलेला दिसत आहे. म्हणतात ना आयुष्यात संघर्ष हा खरा असतो. माझ्यासाठीही संघर्ष असाच खरा होता. आमच्यासाठी तेच खरेखुरे संघर्षाचे दिवस होते. ते आम्हा कक्कर परिवारासाठी गर्वाचे होते.’


तिने पुढे लिहिले की, ‘दुसरा फोटो हा अलिकडचा आहे. या फोटोमध्ये मी एका सुंदर व्यक्तीसोबत आहे. हे ते आहेत ज्यांनी आम्हाला आयुष्यातील सर्वात सुंदर असा फोटो काढण्याची संधी दिली. मनापासून धन्यवाद सर तुम्ही हे सारे फोटोमध्ये सामावून घेतले. तुमच्यामुळे मेहनत करण्याची शक्ती मिळते आहे… जय माता दी…’

AssignmentImage-701487981-1620206558


रोहनप्रीतची कमेन्ट

नेहाच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेतच शिवाय अनेक सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामध्ये नेहाचा नवरा रोहनप्रीतने देखील कमेन्ट केली आहे. ‘कक्कर परिवाराचा संघर्ष हा खरा संघर्ष आहे. त्यामुळेच तू देखील खरी आहेस. खूप प्रेमळ आहेस आणि आजही तितकीच जमिनीवर आहेस. तुझा मला अभिमान आहे.’ अशी कमेन्ट केली. नेहाच्या एका चाहत्याने लिहिले आहे, ‘नेहा मॅडम तुम्ही लहानपणी खूप गोड दिसत आहात आणि आता त्याहीपेक्षा जास्त गोड दिसता.’

करोना- वडिलांचं छत्र हरवलेल्या मुलाला सलमानची लाखमोलाची मदत


नेहा २००६ मध्ये इंडियन आयडलच्या दुसऱ्या पर्वामध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. या स्पर्धेमध्ये ती जास्तवेळ टिकू शकली नाही. परंतु तिचा आवाज अनेकांना आवडला होता. आता तिच नेहा इंडियन आयडलची परीक्षक आहे. नेहाने आतापर्यंत सेकंड हँड जवानी, काला चश्मा, दिलबर, आँख मारे आणि ओ साकी साकी यांसारखी लोकप्रिय गाणी गायली आहेत.



[ad_2]

Source link