Home बातम्या आंतरराष्ट्रीय Bill and Melinda gates अब्जाधीश बिल गेट्स यांचा घटस्फोट; मुलांना मिळणार इतकी संपत्ती

Bill and Melinda gates अब्जाधीश बिल गेट्स यांचा घटस्फोट; मुलांना मिळणार इतकी संपत्ती

0
Bill and Melinda gates  अब्जाधीश बिल गेट्स यांचा घटस्फोट; मुलांना मिळणार इतकी संपत्ती

[ad_1]

वॉशिंग्टन: मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मिलिंडा गेट्स यांनी परस्पर सहमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास २७ वर्षाचे वैवाहिक आयुष्य संपुष्टात आणण्याच्या निर्णयामुळे अनेकजण चक्रावले आहे. बिल गेट्स आणि मिलिंडा गेट्स यांना एक मुलगा आणि दोन मुलींचे पालक आहेत. मुलाचे नाव रॉरी आणि मुलींचे नाव जेनिफर आणि फिओबी आहे. बिल गेट्स हे जगातील प्रमुख श्रीमंत व्यक्तींपैकी एक समजले जातात. त्यामुळे आता घटस्फोटानंतर मुलांना किती संपत्ती मिळेल याबाबत चर्चा सुरू आहेत.

बिल गेट्स यांची संपत्ती सुमारे १०.८७ लाख कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जाते. वर्ष २०१७ मध्ये झालेल्या एका कार्यक्रमातच बिल गेट्स यांनी मुलांना किती संपत्ती मिळणार याबाबत भाष्य केले होते. आपल्या संपत्तीमधून प्रत्येक मुलांना प्रत्येकी १० दशलक्ष डॉलर देण्यात येतील. तिन्ही मुलांना प्रत्येकी जवळपास ७३ कोटी रुपये मिळणार आहेत. बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स हे आपल्या संपत्तीमधील ९५ टक्के हिस्सा हा समाजसेवेसाठी खर्च करणार आहेत. त्यासाठी त्यांनी बिल अॅण्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचीही स्थापना केली आहे.

वाचा:
अब्जाधीश बिल गेट्स आणि मेलिंडा घटस्फोट घेणार; सहमतीने घेतला निर्णय

वाचा:आश्चर्यच ! महिलेने एकाच वेळी ९ बाळांना जन्म दिला

दरम्यान, घटस्फोटाचा निर्णय घेतल्यानंतर बिल गेट्स आणि मेलिंडा यांनी एक संयुक्त निवेदन जारी केले होते. नाते टिकवण्याबाबत दीर्घ काळ केलेल्या चर्चेनंतर आम्ही आमची वैवाहिक जीवन संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. मागील २७ वर्षात आम्ही पालक असल्याची जबाबदारी निभावली. आम्ही एका फाउंडेशनची स्थापनीा केली. त्याद्वारे जगभरातील लोकांचे आरोग्य आणि त्यांना चांगले आयुष्य मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी या निवेदनात म्हटले होते.

वाचा: तीन महिन्यात भारतात करोना बळींचा आकडा १० लाखांवर जाण्याची भीती

बिल गेट्स आणि मेलिंडा यांचा विवाह १९९४ मध्ये झाला होता. या दोघांची पहिली भेट १९८७ मध्ये झाली होती. २७ वर्षाच्या वैवाहिक आयुष्यानंतर विभक्त होण्याचा निर्णय या दोघांनी घेतला. त्यांच्या या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

[ad_2]

Source link