हायलाइट्स:
- गरजूंच्या मदतीसाठी तयार असणाऱ्या सोनूकडे आशेने आले होते लोक
- आलेल्या प्रत्येक व्यक्तीशी बोलताना दिसला सोनू सूद
- मागील वर्षीच्या लॉकडाउनमध्येही सोनुने केली होती गरजूंना मदत
अभिलाषा पाटील यांचं करोनाने निधन, ‘छिछोरे’त केली होती भूमिका
सोनू दिवसरात्र गरजू व्यक्तींची मदत करण्यासाठी तयार असतो. आजपर्यंत सोनूने कुणालाही निराश केलेलं नाही. तो प्रत्येकाची मदत करतो. सोनूचं नाव देशातील कानाकोपऱ्यात पोहोचलं आहे. त्यामुळे लोक इतर कुणाकडेही मदत मागण्यापूर्वी सोनूकडे येतात. अशाच काही गरजू लोकांनी आज सोनूच्या मुंबईतील घराबाहेर गर्दी केली होती. त्यांना पाहून सोनूनेही प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेत मदत करण्याचं आश्वासन दिलं. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी सोनूचं प्रचंड कौतुक करत आहेत.
‘तारक मेहता’मधील कलाकारांचे मानधन कळलं का, घेतात हजारो रुपये
नेटकरी सोनूला हनुमानाची उपमा देत आहेत. एका युझरने सोनूचं कौतुक करत लिहिलं, ‘हा तर हनुमान आहे ज्याने सगळ्यांसाठी संजीवनी आणली होती. असाच तुमचा आशीर्वाद देत राहा.’ तर दुसऱ्या युझरने लिहिलं, ‘सोनूला पंतप्रधान करा.’ मागील वर्षी लागलेल्या लॉकडाउनमध्ये सोनूने कित्येक मजुरांना घरी जाण्यासाठी बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. मजुरांच्या खाण्यापिण्याची देखील व्यवस्था केली होती. मंगळवारी मध्यरात्री आलेल्या एका फोनवर सोनुने दिल्लीतील इस्पितळात १५ ऑक्सिजन सिलेण्डर पोहोचवले होते त्यामुळे २२ रुग्णांचा जीव वाचला होता.