Home बातम्या आंतरराष्ट्रीय करोनापासून दारु वाचवू शकत नाही, अफवांपासून दूर राहा; तज्ज्ञांचा सल्ला

करोनापासून दारु वाचवू शकत नाही, अफवांपासून दूर राहा; तज्ज्ञांचा सल्ला

0
करोनापासून दारु वाचवू शकत नाही, अफवांपासून दूर राहा; तज्ज्ञांचा सल्ला

[ad_1]

हायलाइट्स:

  • दारुच्या अतिसेवनाचा व्यक्तीच्या रोगप्रतिकारक क्षमतेवर परिणाम
  • दारू प्राशन केल्यानं करोना विषाणूविरुद्ध सुरक्षा मिळत नाही
  • सोशल मीडियावर केले जाणारे दावे खोटे

चंदीगड : करोनापासून वाचरण्यासाठी अल्कोहोल सुरक्षा देऊ शकत नाही, त्यामुळे अफवांवर लक्ष देऊ नका अशी सूचना कोविड तज्ज्ञांकडून पुन्हा एकदा देण्यात आलीय. पंजाब विशेष तज्ज्ञांच्या समितीचे प्रमुख डॉ. के के तलवार यांनी सोशल मीडियावर कोविडसंबंधी जनतेला हे आव्हान केलंय.

दारु अधिक प्रमाणात प्राशन केल्यास त्याचा परिणाम व्यक्तीच्या रोगप्रतिकारक क्षमतेवर होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्यापर्यंत करोना संक्रमण सहजगत्या पोहचू शकतं, असं तलवार यांनी म्हटलंय.

दारू प्राशन केल्यानं करोना विषाणूविरुद्ध सुरक्षा मिळते, असे दावे सोशल मीडियावर केले जात असल्याचं निदर्शनास आल्यानंतर डॉ. तलवार यांनी नागरिकांना ही सूचना केलीय. उल्लेखनीय म्हणजे, पंजाबमध्ये सध्या जवळपास चार लाख जणांना करोना संक्रमणानं गाठलंय.

Covid19: करोना संक्रमणानं पुन्हा एकदा तोडले आजवरचे सगळे रेकॉर्ड
Covid19: राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष चौधरी अजित सिंह यांचं करोनानं निधन
अशा प्रकारच्या सार्वजनिक चुकीच्या दाव्यांमुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. लोकांनी अधिक प्रमाणात दारु प्राशन केली तर त्यांच्यापर्यंत संक्रमण पोहचण्याचा धोका अधिक आहे. दारुच्या सेवनानं करोना विषाणू मरत नाही, असं डॉ. तलवार यांनी स्पष्ट केलंय.

तसंच कोविड लस घेण्यापूर्वी आणि लस घेतल्यानंतर दोन दिवसांपर्यंत नागरिकांनी दारुचं सेवन करू नये, याचीही आठवण त्यांनी यावेळी करून दिली.

Tejasvi Surya: करोना बेड घोटाळ्याला तेजस्वी सूर्या यांच्याकडून ‘धार्मिक रंग’, चौकशीचे आदेश
Mamata Banerjee: मुख्यमंत्री ममता ‘अॅक्शन मोड’मध्ये, EC नं हटवलेल्या ‘विश्वासू’ अधिकाऱ्यांची पुन्हा एन्ट्री

[ad_2]

Source link