हायलाइट्स:
- रावणाचे काम करणारे अभिनेते अरविंद त्रिवेदींच्या निधनाची अफवा
- अरविंदजींची प्रकृती उत्तम असल्याचे अभिनेता सुनील लहरीने दिले स्पष्टीकरण
- खोट्या बातम्या न पसरवण्याचे केले आवाहन
अरविंद यांच्यासोबत फोटो सोशल मीडियावर शेअर
अरविंद त्रिवेदी आणि सुनील लहरी यांची चांगली मैत्री आहे. सुनील लहरी यांनी अरविंद यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत एक पोस्ट लिहिली, त्यांनी लिहिले की, ‘करोनामुळे सध्याच्या काळात वाईट बातम्याच अधिक ऐकू येत आहेत. त्यातच अरविंद त्रिवेदी यांच्याबद्दलची अफवा. माझी सर्वांना विनंती आहे की, अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवू नका. देवाच्या कृपेने अरविंदजी यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांची प्रकृती अशीच उत्तम रहावी, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो.’
याआधीही अफवा पसरली होती
अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाची अफवा याआधीही सोशल मीडियावर एकदा पसरली होती. त्यानंतर पुन्हा गेल्या महिन्यात त्यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर आली होती, तेव्हा त्यांच्या भावाने ही बातमी खोटी असल्याचे सांगत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला होता.
दरम्यान, गेल्यावर्षी लॉकडाउनमध्ये दूरदर्शनवरून रामायण मालिका पुन्हा एकदा प्रसारित करण्यात आली होती. त्यामुळे या मालिकेतील सर्व कलाकार पुन्हा एकदा चर्चेत आले. लॉकडाऊनमध्ये ही मालिका प्रसारित झाल्यामुळे लोकांचा काही वेळ चांगला गेला आणि पुन्हा एकदा सर्वाधिक पाहिली गेलेली मालिका असा रेकॉर्ड या मालिकेने रचला.