[ad_1]
हायलाइट्स:
- वयोवृद्ध असल्यानं आसारामला कोविडचा धोका
- कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर श्वासोच्छवासात अडथळा
- ऑक्सिजन पातळी कमी झाल्यानं आयसीयूमध्ये हलवलं
बुधवारी सायंकाळी आसाराम कोविड पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं. आसारामला अस्वस्थपणा जाणवत होता. त्यानंतर अचानक त्याची प्रकृती आणखीनच बिघडल्यानं तुरुंग प्रशासनानं आसारामला रुग्णालयात हलवलं. ऑक्सिजन पातळी कमी झाल्यानं आसारामवर रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू करण्यात आले.
जोधपूरच्या मध्यवर्ती तुरुंगातील एकूण १२ कैदी गेल्या महिनाभरात करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आणखी काही कैद्यांमध्ये करोना संक्रमणाची लक्षणं दिसून येत आहेत. त्यांना तुरुंगाच्या डिस्पेन्सरीमध्ये आयसोलेट करण्यात आलं आहे.
समाजात ‘आसाराम बापू’ म्हणून ओळख तयार करणाऱ्या आसाराम बलात्कार प्रकरणात दोषी ठरलाय. जोधपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात तो शिक्षा भोगत आहे.
दरम्यान, राजस्थानात बुधवारी १६,८१५ करोना संक्रमित रुग्ण आढळले. तर १५५ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या १ लाख ९६ हजार ६८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात एव्हाना करोनामुळे ५०२१ जणांनी आपले प्राण गमावे आहेत.
[ad_2]
Source link