Home बातम्या आंतरराष्ट्रीय Coronavirus vaccine फ्रान्सचा इशारा, लस उत्पादन वाढवा अन्यथा आणखी काही वर्षे करोनाचा सामना करा!

Coronavirus vaccine फ्रान्सचा इशारा, लस उत्पादन वाढवा अन्यथा आणखी काही वर्षे करोनाचा सामना करा!

0
Coronavirus vaccine  फ्रान्सचा इशारा, लस उत्पादन वाढवा अन्यथा आणखी काही वर्षे करोनाचा सामना करा!

[ad_1]

पॅरिस/लंडन: करोनाच्या संसर्गामुळे अनेक देश हैराण झाले आहे. करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. तर काही देशांमध्ये लस तुटवडा जाणवत आहे. अशातच फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन यवेस ली ड्रियान यांनी जी-७ राष्ट्र समूहाला गंभीर इशारा दिला आहे. करोना लशीचे उत्पादन न वाढवल्यास करोना महासाथीचा आजार २०२४ पर्यंत संपुष्टात येणार नाही. करोना लशीचे उत्पादन वाढवून आफ्रिकन देशांनाही लस पुरवठा करावा लागेल असेही त्यांनी म्हटले.

फ्रान्सच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ‘ द गार्डियन’ वृत्तपत्राला सांगितले की, जानेवारीपासून अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांच्याशी त्यांनी अनेक वेळा चर्चा झाली आहे. अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांच्या तीन वर्षांच्या कार्यकाळातही एवढी चर्चा झाली नव्हती. त्यांनी देखील जगातील गरिबांपर्यंत लस पोहचवण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले.

जीन यांनी सांगितले की, गरिबांना लस देणे ही जगातील सात श्रीमंत देशांची जबाबदारी आहे. या वेगाने लसीकरण होत झाल्यास वर्ष २०२४ मध्येच विषाणूविरोधात जगभरात प्रतिकार शक्ती निर्माण होऊ शकते. आपल्या २०२४ पर्यंत मास्कचा वापर करणे, चाचणी करणे आणि करोनाच्या भयावह वातावरणात जगावे लागेल. जगासाठी आणि आपल्या सर्वांसाठी हा पर्याय आहे, असं मला वाटत नाही.

जगभरात करोनाबाधितांची संख्या १५ कोटी ४७ लाखांहून अधिक झाली आहे. तर, ३२ लाख ३० हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत करोनाचा संसर्ग सर्वाधिक फैलावला असून पाच लाख ७० हजारांहून अधिक करोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

[ad_2]

Source link