Home शहरे मुंबई निर्बंधांमध्येही विजेची मागणी वाढतीच

निर्बंधांमध्येही विजेची मागणी वाढतीच

0
निर्बंधांमध्येही विजेची मागणी वाढतीच

[ad_1]

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

राज्यात सध्या करोनासंबंधी निर्बंध आहेत. यामुळे अनेक उद्योगधंदे, व्यवसाय बंद आहे. तसे असतानादेखील विजेची मागणी वाढतीच राहिली आहे. मुंबईतील वीज मागणी २६०० मेगावॉटच्या वर गेली आहे. तर राज्यातील मागणीदेखील १९ हजार मेगावॉटदरम्यान आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची कमाल वीज मागणी ३५०० मेगावॉटच्या घरात असते. मागीलवर्षी लॉकडाउनदरम्यान ही मागणी १५०० मेगावॉटच्या खाली घसरली होती. त्यानंतर मागणीत वाढ होऊन मार्च महिन्यात ती ३,२०० मेगावॉटच्या घरात गेली होती. एप्रिल महिन्यात निर्बंध लागू झाल्यापासून उद्योगधंदे, दुकाने, मॉल्सदेखील बंद आहेत. त्यामुळे या मागणीत घट झाली आहे. पण तसे असतानादेखील मुंबईत बुधवारी दुपारी २६०० मेगावॉटहून अधिक विजेची मागणी होती. टाटा पॉवर, बेस्ट व अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडकडून (एईएमएल) या विजेचे वितरण झाले.

दुसरीकडे मुंबई वगळता उर्वरित राज्यात वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणनेदेखील बुधवारी १९ हजार मेगावॉटहून अधिक विजेचे वितरण संपूर्ण राज्याला केले. हा आकडा २२ हजार मेगावॉटपेक्षा या कमाल मागणीपेक्षा कमी असला, तरी मागील लॉकडाउनपेक्षा अधिक आहे. मागील लॉकडाऊन काळात महावितरणची वीज मागणी संपूर्ण राज्यात १३ हजार मेगावॉटपर्यंत खाली आली होती. त्यानंतर ‘पुन:श्च हरिओम’ प्रक्रियेत राज्याची कमाल मागणी जेमतेम १७ हजार मेगावॉटपर्यंत वाढून मार्च महिन्यात ती २० हजार मेगावॉटच्या पुढे गेली. त्या तुलनेत सध्या निर्बंध व उद्योगधंदे बंद असतानादेखील राज्याची वीज मागणी १९ हजार मेगावॉटच्या पुढे आहे, हे विशेष.

[ad_2]

Source link