Home बातम्या आंतरराष्ट्रीय दुबईच्या प्रशासकाची ६ वी राणी २७१ कोटी रूपये घेवुन बेपत्‍ता !

दुबईच्या प्रशासकाची ६ वी राणी २७१ कोटी रूपये घेवुन बेपत्‍ता !

दुबई : दुबईच्या अरबपती प्रशासकाची ६ वी पत्नी (राणी) हया कोटयावधी रूपये आणि २ मुलांना घेवुन संयुक्‍त अरब अमिरात (UAE) येथुन बेपत्‍ता झाली आहे. तिने घर सोडताना सोबत ३१ मिलियन पाऊंड (२७१ करोड रूपया पेक्षा अधिक रक्‍कम) नेले आहेत. मिडीया रिपोर्टनुसार UAE चे प्रधानमंत्री आणि उपाध्यक्ष (शाह) शेख महम्मद बिन राशिद अल मकतूम यांचे ६ वी राणी हया यांच्यासोबत गेल्या काही दिवसांपासुन चांगले संबंध राहिले नव्हते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार राणी हया या इंग्लंडची राजधानी लंडनमध्ये लपल्याचा संशय आहे.

जगामध्ये सर्वात श्रीमंतापैकी एक दुबईचे प्रशासक शेख

जॉर्डनचे राजा अब्दुलाह यांची सावत्र बहिण असलेली हया यांना आता पती शेख यांच्यापासून विभक्‍त व्हायचे होते. म्हणजेच त्यांना तलाक हवा होता. दुबई येथून निघुन त्यांना जर्मनीमध्ये स्थायिक व्हायचे होते. त्यांनी जर्मनी सरकारकडे मुले जालिया (११ वर्ष) आणि जायद (७ वर्ष) यांच्यासोबत राहण्यासाठी राजकीय शरणार्थी म्हणून स्विकारण्याची मागणी केली आहे.

नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी प्रिन्सेस हया यांनी आपल्यासोबत कोटयावधी रूपये घेतले आहेत. पैशासाठी त्यांना कधीही संघर्ष करण्याची आवश्यकता भासली नाही.

ऑक्सफोर्डमध्ये शिकलेल्या प्रिन्सेस हया

प्रिन्सेस हया या पाश्‍चिमात्य देशाशी चांगल्याच परिचीत आहेत. कारण, त्यांचे शिक्षण हे इंग्लंडच्या ऑक्स्फोर्ड मधून झाले आहे. त्यानंतर त्या समाजिक काम करत होत्या. फेब्रुवारी २०१९ नंतर त्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात अथवा सोशल मिडीयाच्या अकाऊंटवर सक्रिय दिसल्या नाहीत.

मात्र, यापुर्वी त्या सार्वजनिक कार्यक्रामात तसेच सोशल मिडीयावर सक्रिय होत्या. त्यांचे २० मे नंतर फोटो सोशल मिडीयावर देखील आले नाहीत.

दुबईतून निघण्यासाठी या देशाने प्रिन्सेस हया यांना मदत केली

अरबच्या प्रसार माध्यमांनुसार प्रिन्सेस हया यांना दुबई येथून बाहेर पडण्यासाठी जर्मनीच्या राजकीय लोकांनी मदत केली आहे. २७१ कोटीहून अधिक रक्‍कम आणि दोन मुलांना दुबईतून घेवुन बाहेर पडणे हे सोपे नव्हते म्हणनू त्यांनी जर्मनीची मदत घेतली असावी असा दावा करण्यात आला आहे.

स्थानिक मिडीयाने दिलेल्या माहितीनुसार, प्रिन्सेस हया आणि जर्मनीतील काही राजकीय लोकांचे पुर्वी पासुनच अतिशय चांगले संबंध आहेत. त्यामुळेच त्यांनी जर्मनीच्या दुतावासाची मदत घेतली असावी असे सांगण्यात येत आहे.

जर्मनी आणि युएईने संबंध बिघडणार

प्रिन्सेस हया यांना दुबईतून बाहेर पडण्यासाठी जर्मनीच्या राजकीय लोकांनी मदत केल्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडण्याची दाट शक्यता आहे. प्रशासक शेख महम्मद बिन राशिद अल मकतून यांनी प्रिन्सेस हया बेपत्‍ता झाल्यानंतर तात्काळ जर्मनीकडे त्याबाबत माहिती मागितली आहे. एवढेच नव्हे तर प्रशासन शेख यांनी जर्मनीमध्ये संबंधितांना फोन करून प्रिन्सेस हया यांना परत पाठवण्याची मागणी देखील केली आहे. मात्र, जर्मनीने याबाबत त्यांना मदत करण्यास नकार दिला आहे.

प्रशासक शेख यांच्या मुलीने देखील केला पलायनाचा प्रयत्न

प्रिन्सेस हया बेपत्‍ता होण्यापुर्वी शेख यांची मुलगी राजकुमार लतिफा यांनी देखील दुबईतून पलायन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, राजकुमारी लतिफा यांना भारतातील गोव्या जवळ तटरक्षक दलाने पकडले होते. त्यानंतर तत्सम कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर राजकुमारी लतिफा यांना प्रशासक शेख यांच्याकडे पाठविण्यात आले होते.