पुणे गुन्हे शाखेने केला नायजेरीयन आरोपीकडुन अंमली पदार्थाचा मोठा साठा जप्त

- Advertisement -

पुणे : पुणे शहरात अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका नायजेरीयन नागरिकाला अटक करून ४९ लाख रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले. पुणे पोलिसांनी नायजेरीयन नागरीकाकडून ४८८ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. तसेच ८ लाख रुपयांची रोकड, विदेशी मद्याच्या बाटल्या आणि होंडा सीआरव्ही कार असा एकूण ६३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
फॉलरीन अब्दुल अजिज अन्डोई असे अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या नायजेरीयन नागरिकाचे नाव आहे. पुण्यामध्ये बाणेरयेथे तो राहत होता. बाणेर येथे असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अटक केली.आहे
आरोपीला २०१३ मध्ये अंमली पदार्थाची विक्री केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती.
त्यावेळी त्याला चार वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली होती. शिक्षा संपताच त्याने पुन्हा अंमली पदार्थाची विक्रीच्या व्यवसायात सक्रीय झाला होता. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर असे निदर्शनास आले की पुणे परिसरात बाणेर कोंढवा एन आयबीएम रोड कोरेगाव पार्क कॅम्प कल्याणी नगर व इतर ठिकाणी वस्तीमध्ये कारमध्ये फिरून त्याचे इतर साथीदाराच्या मदतिने अमली पदार्थ विक्री करत असे अनेक दिवसांपासून त्याच्या मागावर पोलीस होते, अशी माहिती अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे यांनी दिली.नमूद कारवाई ही वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोहिते, सौ मनिषा झेंडे, गजानन पवार, अधिपत्याखाली पोलिस उप-निरीक्षक निखिल पवार, पोलीस कर्मचारी अविनाश शिंदे, प्रविण शिके,दिलीप जोशी, साबळे, राहिगुडे,मगर, साळुंके, बागवान, कोकरे ,बग्गु,शेख ,छडीदार, चंदन, महाजन, किरण अब्दागिरे, मोहिते मदने, यांनी केली गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते हे करीत आहे

- Advertisement -