जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये बस दरीत कोसळून 30 प्रवासी ठार; २२ जखमी

- Advertisement -

श्रीनगर : जम्मू-काश्मीरस्थित किश्तवाडमध्ये एक बस दरीत कोसळून ३३ प्रवासी ठार झाले आहेत. तर २२ जण जखमी झाले आहेत. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे

केशवानहून किश्तवाड या ठिकाणी ही बस चालली होती. त्याच प्रवासादरम्यान ही बस दरीत कोसळली आणि ३३ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, ३३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दुःख व्यक्त केले आहे.

- Advertisement -