Home बातम्या राजकारण महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी या नेत्याचं नाव जवळपास निश्चित?

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी या नेत्याचं नाव जवळपास निश्चित?

मुंबई : काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होणार असल्याचं कळतंय.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी बरीच नावं चर्चेत होती. मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी विखे पाटलांनी युतीचा प्रचार केला. तेव्हा थोरात यांनी मात्र निष्ठेनं आघाडीचा उमेदवार निवडून यावा यासाठी प्रयत्न केल्यानं त्यांना हे गिफ्ट मिळणार असल्याचं बोललं जातंय.

दरम्यान, 2009 च्या आघाडी सरकारच्या काळात त्यांनी कृषी आणि महसूल खात्याची जबाबदारी सांभाळली होती.