Home बातम्या महत्वाच्या बातम्या कोकण रेल्वेच्या पाच गाड्या रद्द; बुधवारची जनशताब्दी आणि तेजस एक्स्प्रेसही रद्द

कोकण रेल्वेच्या पाच गाड्या रद्द; बुधवारची जनशताब्दी आणि तेजस एक्स्प्रेसही रद्द

रत्नागिरी:

मुंबईमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. कोकण रेल्वेच्या पाच गाड्या रद्‌द झाल्या असून दोन गाड्या या पनवेल रेल्वेस्थानकावरुन सोडण्यात आल्या आहेत. उद्या दि. 3 जुलै रोजीच्या मडगावहून मुंबईला जाणारी जनशताब्दी आणि करमाळीहून मुंबईला जाणारी तेजस एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने मुंबई जलमय झाली आहे. त्यामुळे कोकण रेल्वेच्या वाहतूकीवर त्याचा परिणाम झाला आहे गाडी क्र.50103 आणि 50104 दादर-रत्नागिरी-दादर पॅसेंजर ही गाडी, गाडी क्र.22119 मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते करमाळी तेजस एक्स्प्रेस, गाडी क्र.12051 दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस या तीन गाड्या रद्‌द करण्यात आल्या आहेत. गाडी क्र.22113 एलटीडी कोच्चुवली ही गाडी रद्द करण्यात आली. गाडी क्र.12223 ही 8 वाजून 50 मिनीटांनी सुटणारी गाडी आज रात्री 1 वाजून 30 मिनीटांनी सुटणार होती. गाडी क्र.12620 मंगळूर-लोकमान्य टिळक टर्मिनस मत्स्यगंधा एक्स्प्रेस ही पनवेलपर्यंतच धावली़. गाडी क्र.12619 लोकमान्य टिळक टर्मिनस – मंगळूर मत्स्यगंधा एक्स्प्रेस ही गाडी पनवेलवरुन सोडण्यात आली़.

११००३ तुतारी एक्स्प्रेस साडेचौदा तास उशीराने 
गाडी क्र.11003 तुतारी एक्स्प्रेस ही रात्री १२ वाजून ५मिनीटांनी दादर स्थानकावरुन सुटणारी गाडी आज दुपारी दीड वाजता सुटली. ही गाडी संध्याकाळी ७ वाजता रत्नागि री स्थानकात पोहोचली होती. त्यामुळे सावंतवाडीहून साडेपाचला सुटणारी गाडी क्र.11004 तुतारी एक्स्प्रेस ही गाडी सावंतवाडी स्थानकावरुन रात्री साडेअकरा वाजता सुटणार होती. तब्बल 14 तास 35 मिनीटे उशीराने धावत होती. मंगला एक्स्प्रेस 7 तास 40 मिनीटे उशीराने धावत होती. उर्वरित सर्वच गाड्या उशीराने धावत होत्या.