Home बातम्या राजकारण मी विधानसभेतला सर्वात भ्रष्ट आणि नालायक आमदार- एकनाथ खडसे

मी विधानसभेतला सर्वात भ्रष्ट आणि नालायक आमदार- एकनाथ खडसे

मुंबई :विधानसभेतल्या 288 आमदारांपैकी सर्वात भ्रष्ट आणि नालायक आमदार म्हणून मी उभा आहे, अशी खंत सातत्याने होणाऱ्या आरोपांना उत्तर देताना एकनाथ खडसेंनी व्यक्त केली आहे.

सभागृहात आरोप-प्रत्यारोप होत असतात. मी विरोधी पक्षनेता असताना पुराव्याशिवाय कधीही आरोप केले नाहीत. बिनबुडाचे आरोप केल्याने काय दु:ख होतं हे मी चांगलंच जाणतो, असं खडसेंनी विधानसभेत बोलताना म्हटलं.

दाऊदच्या बायकोशी माझे बोलण्याचे संबंध जोडले गेले. दाऊद सोडून तिला नाथाभाऊंशी का बोलावसं हे वाटलं मला काही कळलंच नाही. मात्र चौकशीअंती काहीच सिद्ध झालं नाही, त्यामुळे बरं वाटल्याचं खडसेंनी सांगितलं.

दरम्यान, एकनाथ खडसे सातत्याने पक्षावरची नाराजी आपल्या बोलण्यातून व्यक्त करत अाहेत.