Home गुन्हा खळवट लिमगावच्या तरूण शेतकर्याची गळफास घेऊन आत्महत्या

खळवट लिमगावच्या तरूण शेतकर्याची गळफास घेऊन आत्महत्या

वडवणी : (प्रतिनिधी)
वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव येथील तरूण शेतकरी मयत बालासाहेब रामभाऊ गायकवाड वय वर्ष (40) या शेतकर्याने सततच्या नापिकी व कर्जाला कंटाळुन काल दि. 02 च्या पहाटे 5 च्या दरम्यान लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आसुन या घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलीस स्टेशनचे घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह कुप्पा येथील रूग्नालयात पि.एम साठी पाठविला.
याबाबत अधिक माहिती अशी की,
वडवणी तालुक्याला गेल्या वर्षापासुन दुष्काळाने ग्रासले आसुन तालुक्यात आत्महत्याचे सञ सुरूच आहे. खळवट लिमगाव येथील शेतकरी मयत बालासाहेब रामभाऊ गायकवाड वय (40 ) वर्ष या शेतकर्यानी सततची नापिकी तसेच डोक्यावर कर्जाचा डोंगर व यावर्षीची पेरणी कशी करायची यासह आनेक विवेचनेतुन निराश होऊन घरपासुन जवळच असलेल्या स्वताच्या शेतात पहाटे 5 च्या सुमारास लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घडली आसुन शेतकर्याच्या वडिलाच्या नावे साडेसहा एकर कोरडवाहु जमीन आसुन त्यांचेकडे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्ज 60,000 हजार आहे. तर डिसीसी बँकेचे 70,000 हजार कर्ज आहे. मयत शेतकर्याच्या पश्चात आई वडील,एक भाऊ, पत्नी व तिन लहान मुले आहेत. गायकवाड कुंटूंबाची परिस्थिती अंत्यत बिकट आसुन मुलाच्या शिक्षणासाठी शासनाच्या आर्थिक मदतेची गरज आसुन त्वरित मदत करावी अशी मागणी गावतील नागरिकांनी केले आहे. या घटनेचा अधिक तपास वडवणी पोलीस स्टेशनचे सपोनी सुरेश खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. काँ. शिंदे व पो. काँ. वाघमारे करत आहेत.