Home शहरे औरंगाबाद खुलताबादचे मा.तहसीलदार व पंचायत समिती चे मा. गटविकास अधिकारी यांची गदाना येथील वैकुंठ धाम स्मशानभूमीला दिली अचानक भेट

खुलताबादचे मा.तहसीलदार व पंचायत समिती चे मा. गटविकास अधिकारी यांची गदाना येथील वैकुंठ धाम स्मशानभूमीला दिली अचानक भेट

.
गदाना (प्रतिनिधी) ता.खुलताबाद आज गदाना येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे ठीक सायंकाळी 6:00 वाजत मा.श्री.तहसीलदार साहेब व मा.श्री.गटविकास अधिकारी साहेब यांनी अचानक भेट दिली.ह्या स्मशानभूमीचे नंदनवन बघून दोन्हीही अधिकारी अत्यंत भारावून गेले.त्यांना ह्या स्मशानभूमीचे आगळे वेगळे रूप दिसले.इथल्या परिसराच्या सोयी सुविधा अत्यंत आकर्षक आणि सुसज्ज आहे असे त्यांनी कौतुक केले.

गदाना स्मशानभूमीत प्रत्येक फळांचे झाडे आहे.(चिंच,जांभूळ,आंबा,सिताफळ,बोर,लिंब,वड,पिंपळ.इ)यात त्यांनी आज इथल्या जांभूळ फळांचा आस्वाद घेतला.त्या जांभळात इतका गोडवा होता की दोन्ही अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर आम्हा ग्रामस्थांना दिसून येत होते.वेळ त्यांच्या डुयटी ची नव्हतीच.ह्या स्मशानभूमीचे झाडे,ठिबकसिंचन,पाण्याची टाकी आशा अनेक सुविधा ह्या लोकसहभागातून झालेल्या आहे.हे ऐकून साहेबांना आनंदच वाटला.इथलं पाणी फाउंडेशन चे काम ह्या गावची एकात्मता, इथली वृक्ष संवर्धनाची पद्धत सर्व गोष्टीनी हे अधिकारी साहेब खूष झाले.त्यांनी ही सांगितले तुमच्या सारखे गाव जर असे उत्साही असेल तर आम्हीही तुमच्या साठी केव्हाही अर्ध्या रात्री आम्हाला हाक मारा आम्ही सदैव तुमच्या सोबत आहे.
यावेळी मा.श्री.गायकवाड साहेब व मा.श्री.मोकाटे साहेब यांनी गदाना ग्रामस्थां सोबत मनमुराद चर्चा केली.यावेळी पं.स.सदस्य पती श्री.प्रकाश बापू चव्हाण,ग्रा.पं.सदस्य श्री.राजू चव्हाण,श्री.संजय चव्हाण,श्री.बाबासाहेब खाडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
देणाऱ्याचे हात भरपूर आहे फक्त घेणाऱ्याचे हात चांगले असायला हवे