Home ताज्या बातम्या भारतातील ‘ही’ गुहा सांगते सृष्टीच्या अंताची कहाणी; वाचून व्हाल थक्क!

भारतातील ‘ही’ गुहा सांगते सृष्टीच्या अंताची कहाणी; वाचून व्हाल थक्क!

जगभरामध्ये अनेक अशी ठिकाण आहेत जी आपल्या वेगळ्या अस्तित्वासाठी किंवा महत्त्वासाठी ओळखली जातात. यामध्ये काही गुहांचाही समावेश आहे. जगभरामध्ये असलेल्या अनेक गुहा आपलं अद्भूत रहस्य आणि आगळ्या-वेगळ्या वैशिष्ट्यासाठी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अद्भूत गुहेबाबत सांगणार आहोत. ज्यामध्ये या सृष्टीचा अतं होण्याचं रहस्य दडलं आहे. ही गुहा भारतातीलउत्तराखंड, कुमाऊ मंडलच्या गंगोलीहाट कस्बेमध्ये स्थित आहे. या गुहेबाबत अशी अख्यायिका सांगितली जाते की, या गुहेमध्ये या सृष्टीचा अतं कधी होणार याचं रहस्य दडलेलं आहे. जाणून घेऊया या गुहेबाबत आणखी काही आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी..

उत्तराखंडमध्ये स्थित असणाऱ्या पाताळ भुवनेश्वर गुहेचा उल्लेख अनेक शास्त्रांमध्येही करण्यात आलेला असला तरिही याबाबत फार कमी लोकांना माहीत आहे. खरं तर असं म्हटलं तरि वावगं ठरणार नाही की, ही गुहा म्हणजे अनेक आश्चर्यकारक गोष्टींचा खजिनाच आहे. ही गुहा पिथौरागढच्या गंगोलीहाट कस्बेच्या डोंगरांमध्ये 90 फूट अंतरावर ही गुहा आहे. असं सांगण्यात येतं की, या गुहेमध्ये असलेल्या एका दगडावरून असं समजण्यास मदत होते की, या सृष्टीचा अतं कधी होणार आहे? या गुहेचा शोध भगवान शंकराचे उपासक अयोध्येचे राजा ऋतुपर्ण यांनी लावला होता. 

भुवनेश्वर गुहेमध्ये युगांचं प्रतीक म्हणून चार दगड आहेत. ज्यामधील एका दगडाला कलियुगाचं प्रतिक मानलं जातं. या दगडाची उंची हळूहळू वाढत असून असं मानलं जातं की, ज्या दिवशी हा दगड भितींला टेकेल त्यादिवशी कलियुगाचा अंत होणार. 

पाताळ भुवनेश्वराच्या नावाने ओळखली जाणारी ही गुहा भगवान शंकरांचं निवास स्थान मानली जाते. येथे भगवान शिव, ब्रम्हा आणि विष्णू यांच्या मुर्ती आहेत. गुहेच्या छतावर असलेल्या एका छिद्रामधून या तिन्ही मुर्त्यांवर एक-एक करून पाणी पडत राहतं. तुम्ही या गुहेमध्ये भगवान शंकराच्या जटांसोबत केदारनाथ, बद्रीनाथ आणि अमरनाथ यांचेही दर्शन घेऊ शकता. असं म्हटलं जातं की, येथे सर्व देव एकत्र येऊन भगवान शंकराची पूजा करत असत. 

गुहेमध्ये तयार करण्यात आलेल्या 4 दरवाज्यांना पाप द्वार, रणद्वार, धर्मद्वार आणि मोक्ष अशा स्वरूपात तयार करण्यात आलं आहे. या गुहेचं पाप द्वा रावणाच्या मृत्यूनंतर, रणद्वार महाभारतानंतर बंद झालं होतं. त्यातील धर्मद्वार अजूनही खुलं असून ते एवढं निमुळतं आहे की, यातून आत जाणं अत्यंत अशक्य आहे. आतमध्ये जाताना तुम्हाला या गुहेच्या भिंतींवर एक हंसाची आकृती पाहायला मिळते. येथील लोकांचं असं म्हणणं आहे की, हे श्री भगवान ब्रम्हांच्या हंसाची आकृती आहे. 

गुहेच्या आतमध्ये 33 कोटी देव-देवतांच्या आकृत्यां व्यतिरिक्त शेषनागाचा फणादेखील आहे. दरवर्षी येथे अनेक पर्यटक ही गुहा पाहण्यासाठी देश-विदेशातून येत असतात. या गुहेमध्ये प्रवेश केल्यानंतर खाली जाऊन तुम्हाला थंड पाण्यामधून जावं लागतं. येथे तुम्हाला निसर्गसौंदर्याचाही आनंद घेता येईल. असं मानलं जातं की, या गुहेमध्ये गेल्यानंतर मानवाच्या शरीरातील काही रोग, व्याधी आपोआप नष्ट होऊन जातात. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.