Home क्रीडा 12 व्या आंतराष्ट्रीय शोतोकोन कराटे स्पर्धेमध्ये खेळाडूंपैकी 14 खेळाडूंनी पदक पटकावून इतिहास रचला

12 व्या आंतराष्ट्रीय शोतोकोन कराटे स्पर्धेमध्ये खेळाडूंपैकी 14 खेळाडूंनी पदक पटकावून इतिहास रचला

पुणे : काठमांडू, नेपाळ या ठिकाणी झालेल्या 12 व्या आंतरराष्ट्रीय शोतोकोन कराटे स्पर्धेमधे आपल्या पुणे शहरातील हडपसर, केशवनगर, वडगाव शेरी, कात्रज व पिंपरी चिंचवड या ठिकाणी आर्यन मार्शल आर्ट्स स्पोर्ट्स क्लब या संस्थेच्या अंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या एकूण 21 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
खेळाडूंना प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक मा. श्री राजेश कांबळे सर हे स्वता आंतरराष्ट्रीय पदक विजेता व तसेच आर्यन मार्शल आर्ट स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक आहेत. आर्यन मार्शल आर्ट स्पोर्ट्स क्लब हि संस्था गेल्या 7वर्षांपासून पुणे जिल्हात कार्यरत आहेत.

या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंपैकी 14 खेळाडूंनी पदक पटकावून इतिहास रचला आणि आपल्या देशाचा तिरंगा फडकला.

या खेळाडूंमध्ये गौरी शिंदे, श्रीयस चव्हाण व श्रीकांत सोमासे यांनी सुवर्ण पदक पटकावले.
यश देसाई याने रौप्यपदक व तसेच वैष्णवी भोसले, शंतनू शिवरकर, अरविंद वैष्णव, फरहान शेख, अशोक मुखीया, तेजेश कांबळे, सनी गाडे, सिद्धांत ओहाळ, आदित्य यादव आणि आर्यन भोसले या खेळाडूंनी रौप्य पदकाची कमाई केली.
या सर्व खेळाडूंचे अभिनंदन एम. के फिटनेस जिमचे संस्थापक मा. श्रीकांत क्षीरसागर यांनी व्यक्त केले व तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मा. राजेश कांबळे व नागनाथ मेढे. रमीत वाघोले यांनी हे प्रशिक्षण वर्ग या कारणास्तव सुरू केले होते की, आजकालचा वाढत्या गुन्हेगारीच्या युगामध्ये लहान मुलां – मुलींना व महिलांना निर्भयपणे वावरता यावे, अशा उद्देशाने सुरु केले होते, व आजही ते आपल्या विद्यार्थ्यांसह या कार्यरत आहेत.