जे.एस.डब्ल्यू.च्या सी.एस.आर. निधीतून 86 सार्वजनिक शौचालयांत सॅनिटरी नॅपकीन वेंडींग मशीनची सुविधा

- Advertisement -

    हे शहर आपले आहे व शहरातील नागरिकांचे आपण काही देणे लागतो या भूमिकेतून सामाजिक बांधिलकी जपणा-या व व्यावसायिक सामाजिक दायित्व (सी.एस.आर.) निधीतून नागरिकांसाठी लाभदायी सुविधा पुरविण्यात पुढाकार घेणा-या उद्योग समूह आणि व्यावसायिक संस्थांची प्रशंसा करत नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी जे.एस.डब्ल्यू. या व्यावसायिक संस्थेमार्फत सॅनिटरी नॅपकीन वेंडींग मशीनची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल कौतुक केले. जे.एस.डब्ल्यू. ग्लोबल बिझनेस सोलूशन लि. बेलापूर यांच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शौचालयात सॅनिटरी नॅपकीन वेंडींग मशीन बसविणेच्या सेक्टर 11 सी.बी.डी. बेलापूर येथे पंजाब नॅशनल बॅंकेजवळील फुड स्टॉलनजीक संपन्न झालेल्या शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.

      याप्रसंगी महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या समवेत बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., स्थायी समितीचे सभापती श्री. नविन गवते, सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे, नगरसेवक श्री. अशोक गुरखे, परिमंडळ 1 चे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त श्री. तुषार पवार, जे.एस.डब्ल्यू. चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नवनीत बन्सल, लेखा विभागाचे प्रमुख श्री. तरूण आही, श्री. नितीन वेलापूरकर, श्री. ऋषिकेश एन., श्रीम. तरू पंत, श्रीम. अक्षता राव, श्री. यतीश बन्सल, श्री. सौम्यदिप्ता दत्ता तसेच कार्यकारी अभियंता श्री. अजय संख्ये, परिमंडळ 1 चे सहा. आयुक्त श्री. चंद्रकांत तायडे, बेलापूर विभाग अधिकारी श्री. शशिकांत तांडेल, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

      बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांनी आपल्या मनोगतात महिलांसाठी एक चांगली सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत सध्या महिलांसाठीच्या सार्वजनिक स्वच्छतागृहात 86 ठिकाणी बसविण्यात येणा-या सॅनिटरी नॅपकीन वेंडींग मशीनमध्ये वाढ करावी असे सूचित केले. सिडको, कोकण भवन, कार्पोरेट कंपन्या अशी मोठी कार्यालये, रेल्वे स्टेशन बस डेपो, मार्केट अशी वर्दळीची ठिकाणे येथे प्राधान्याने महिलांच्या सोयीसाठी सॅनिटरी नॅपकीन वेंडींग मशीनची सुविधा उपलब्ध करून द्यावी असे त्यांनी सांगितले.

????????????????????????????????????

      महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी महानगरपालिकेच्या वतीने महापालिका शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकीन वेंडींग मशीनची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचे सांगत नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक / सामुदायिक शौचालयांमध्ये देखील सी.एस. आर. निधीतून महिलांसाठी 86 ॲटोमॅटीक सॅनिटरी नॅपकीन वेंडींग मशीन उपलब्ध करून दिली जात असल्याचे सांगितले. स्वच्छ व सुंदर नवी मुंबईची प्रतिमा कायम राखणे ही महानगरपालिकेची संकल्पना असून त्याकरीता शौचालयांच्या नियमित देखभाल व दुरुस्तीसाठी प्रणाली उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच जी.पी.एस. मॉनिटरींग सिस्टीमही कार्यान्वित करण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली.

      जे.एस.डब्ल्यू. व्यावसायिक संस्थेमार्फत सी.एस.आर. अंतर्गत संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर महिला शौचालयांचा वापर होतो अशा 86 सार्वजनिक / सामुदायीक शौचालयांमध्ये 17 लक्ष 20 हजार इतका निधी खर्च करून सॅनिटरी नॅपकीन वेंडींग मशीन लावण्यात आले असून यापुढील काळात त्यांची संख्या वाढविण्यात येईल असे सांगण्यात आले.

- Advertisement -