Home ताज्या बातम्या वैधकीय क्षेत्रातील ७०/३० आरक्षण रद्द करा या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा उपविभागीय कार्यालयावर एलगार

वैधकीय क्षेत्रातील ७०/३० आरक्षण रद्द करा या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा उपविभागीय कार्यालयावर एलगार

७०/३० वैधकीय आरक्षण रद्द करा – मनोज फरके

माजलगाव: वैधकीय शिक्षण क्षेत्रातील ७०/३० प्रादेशिक आरक्षण प्रणालीमुळे मराडवाडयातील वैधकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असुन या प्रश्नी प्रशासनाला जागे करण्यासाठी आज विद्यार्थी व पालक यांनी विद्यार्थी नेते मनोज फरके यांच्या नेतृत्वाखाली माजलगाव उपविभागीय कार्यालयासमोर निदर्शने करत एलगार पुकारला या वेळी मराठवाडयावर अन्याय करणारं ७०/३० वैधकीय आरक्षण रद्द करा या घोषनेने हा परिसर दणदणुन गेला या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी शोभा ठाकुर यांना देण्यात आले .

या वेळी प्रा प्रशांत तौर सर प्रा राजाभाऊ सोळंके बाबुराव जाधव प्रा दत्ता फपाळ सर प्रा दत्ता बहिर सर प्रा भगवान गायकवाड प्रा गणेश सुरवेस प्रा एजाज देशमुख सर प्रा कैलास गव्हाणे सर वसंतराव हाजारे सतिश थोरात महेश सावंत गोंविद शिंदे यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते .या वेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.