Home ताज्या बातम्या शेतात पेरणी करत आसताना महिलेवर रानडुकराचा हल्ला महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार

शेतात पेरणी करत आसताना महिलेवर रानडुकराचा हल्ला महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार

माजलगाव : (प्रतिनिधी) तालुक्यातील मोरेवाडी येथील महिला शेतात कपाशीची लागवड करत आसताना अचानक रानडुकराने हल्ला केला यात महिलेच्या पायाला जबरदस्त पायाला चावा घेतल्याने महिला गंभीर जखमी झाली आहे.हि घटना काल दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
    सारिका राजेश आगलावे वय-३५ वर्ष असे या जखमी महिलेचे नाव आहे.सदरील महिला हि काल स्वताच्या शेतात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने कपाशीची लागवड करत होती अचानक रानडुकराने पाठीमागून येऊन हल्ला केला यात महिलेच्या पायाला जबरदस्त चावा घेतला असुन इतर शरीरावर हि दुखापत झाली आहे. महिलेला बीडच्या शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.तर अशा घटना या भागात आठ दिवसांपासुन सातत्याने होत आहेत.कुठे हल्ले होत आहेत.तर कुंठ रानडुकराचे जनावरे आढळून येत आहेत.यामुळे शेतातील कामे करणे जरा जिकारीचे बनले असुन याकडे वनविभागाचे माञ साफ दुर्लक्ष असल्याचे पाहवयास मिळत असुन या हल्लामुळे अनेक शेतात काम करणार्‌या शेतमजुंराच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. अशा रानडुकरांचा तात्काळ बदोबस्त वनविभागाने करावा अशी मागणी होत असुन याबाबती आपण स्वता धारुर येथील वनविभागाच्या अधिकार्‌याना भेटून चर्चा करणार आहोत आणि यांचे लेखी निवेदन हि देणार आहोत अशी माहिती  मोरेवाडीचे सरपंच तथा युवा नेते लहु काळे यांनी दिली आहे.