मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेत्री कंगना रनोट आणि तिची बहीण रंगोली चंदेलने पत्रकारांना अपशब्द वापरले. हे कृत्य त्यांना आता चांगलेच महागात पडले आहे. ‘गिल्ड ऑफ इंडिया’ने कंगनाचा चित्रपट ‘जजमेंटल है क्या’ च्या वृत्तांकनावर पूर्णपणे बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. कंगनाने या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेवेळी पत्रकाराला खूपच सुनावले होते. यानंतर तिच्या बहिणीनेही मीडियाविरुद्ध ट्विटरवर गरळ ओकली होती.
- Advertisement -