Home अश्रेणीबद्ध Blog | हा फ्रॉड मोठा आहे की..!

Blog | हा फ्रॉड मोठा आहे की..!

टॅक्सी सर्व्हीस च्या नावाखाली लोकांना डिस्काऊंटमध्ये चारचाकी गाड्या घ्यायला लावायचं, महीन्याला एक किमान उत्पन्नाची हमी द्यायची, आणि एखाद्या शोरुमशी टायअप करुन थोडाफार डिस्काऊंट देऊन, एखाद्या बँकेचे किंवा फायनन्स कंपनीचे कर्ज देऊन गाडी विकायची..!

सध्या हा फ्राॅड बऱ्याच ठिकाणी चालू आहे. या लोकांचा व्यवसाय टॅक्सी सर्व्हीस चा नसतो, तर गाडी विकण्याचा आणि कर्ज देण्याचा, आणि‌ कार ईन्श्युरंस असतो. हे सगळे धंदे चालण्यासाठी टॅक्सी सर्व्हीस चा धंदा दाखवणं फक्त आवश्यक असतं.

ओला कॅब ला गाडी लावुन देतो च्या नावाखाली मागील पाच सात वर्षात बऱ्याच जणांना गंडवलं गेलंय… कंपनीच्या नावाखाली कित्येकांनी उ़खळ पांढरे करुन घेतले… कालांतराने ते बंद झाले. आता‌ ईतर जण पुढे आलेत.

ओला मधे गाडी लावुन देतो, महीन्याला किमान ३० हजार मिळतील अशी आश्वासने दिली गेली. विना झंजट पैसा मिळतोय म्हटल्यावर कित्याकांनी कर्ज काढुन गाड्या घेतल्या… आता‌ त्यांचा ड्रायवरचा खर्च सुद्धा निघत नाहीये… 
आश्वासने देणारे आॅफीस बंद करुन गायब झालेत, काहींना तोंडी आश्वासने दिली गेलती, त्यांनी तोंड वळवले… आता‌ बँक, फायनान्स कंपन्यां कर्जाच्या हफ्त्यांसाठी‌ मागे लागल्या आहेत… दोन तीन गड्या‌ घेणारे‌ तर‌ पार कामालाच लागलेत…‌

फसवणुकीची ही यशस्वी पद्धत जशीच्या तशी आता काही जणांनी पुन्हा सुरु केली आहे. आणि फिक्स पेमेंट च्या हव्यापायी आईतखाऊ नमुने कोणताही अभ्यास न करता यांच्या जाळ्यात अडकत आहेत….‌

साधा प्रश्न विचारावा… गाडी तुमच्याकडुनच का घ्यायची? माझ्याकडे नवी गाडी आहे तीच कंपनीकडे लावून घ्या… पुढच्या मिनीटाला दारातुन हाकलुन लावतील…!