Home ताज्या बातम्या Facebookला टक्कर देण्यासाठी Google आणणार ‘Shoelace’?

Facebookला टक्कर देण्यासाठी Google आणणार ‘Shoelace’?

नवी दिल्ली : गुगल आपल्या युजर्ससाठी नेहमीच नव-नवीन अपडेट घेऊन येत असते. यावेळी गुगलने ‘Shoelace’ अॅप आणण्याच्या तयारीत आहे. ‘Shoelace’ गुगलचा सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी गुगलने आपले जुने सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म Google+ बंद केले. त्यामुळे गूगल आपल्या युजर्संना नवीन ‘Shoelace’ सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आणण्याची शक्यता आहे. फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मच्या तुलनेत Google+ ला म्हणाला तितका प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गुगलने Google+  बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. 

सोशल नेटवर्किंगमध्ये स्पेस बनवण्याची तयारी
 ‘Shoelace’ च्या माध्यमातून गुगल पुन्हा एकदा सोशल नेटवर्किंग स्पेसमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. याआधी Google+ याशिवाय गुगलच्या फ्रेन्ड कनेक्ट आणि गुगल बज सुद्धा युजर्सकडून चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. एप्रिलमध्ये Google+  बंद केल्यानंतर पुन्हा  ‘Shoelace’ च्या माध्यमातून गुगल सोशल नेटवर्किंगमध्ये दमदार एन्ट्री करण्याच्या प्रयत्नात आहे.   ‘Shoelace’ च्या नावानुसार असे समजते की, गुगलचे हे सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म लोकांना एकत्र आणण्याचे काम करेल. 

युजर्सच्या लाईफमध्ये भरणार रोमांच
गुगल आपल्या ‘Shoelace’  या सर्व्हिसमधून युजर्सच्या सोशल लाईफला सुपरचार्ज करु पाहत आहे. यासाठी ‘Shoelace’  च्या माध्यमातून एकसारख्या विचारधारेच्या व्यक्तींना एकत्र आणण्याचा प्रयत्न करेल. यासाठी ‘Shoelace’ युजर्सच्या पसंतीला नक्कीच उतरेल अशी आशा आहे. 

अॅक्टिव्हिटी आणि इव्हेंट
अॅपमध्ये दिलेल्या  ‘Loop’ मधून युजर्स इव्हेंट आणि अॅक्टिव्हिटीचा प्लॅन करु शकतात. तसेच, यामध्ये भाग घेऊ शकतात. त्यामुळे ‘Shoelace’ ला हायपरलोकल अॅप सुद्धा म्हटले जाऊ शकते, जसे की फेसबुक इव्हेंट सारखे. गुगलचे हे फीचर अशा लोकांच्या कामी येईल की, जे नवीन शहरात आले आहेत आणि त्या शहराबद्दल माहिती जाणून घेणार आहेत.

टेस्टनंतर होणार लॉन्च
ये प्रॉडक्ट गुगलच्या वर्कशॉप Area 120 द्वारे तयार करण्यात आले आहे. ज्याचा मुख्य उद्देश रियल-वर्ल्ड कनेक्शन आहे. दुसऱ्या सोशल नेटवर्क्सच्या तुलनेत गुगल याला लहान स्तरावर लॉन्च करणार आहे. सध्या गुगल ला न्यूयॉर्कमध्ये टेस्ट केले जाणार आहे. यशस्वी टेस्टिंगनंतर याला अन्य शहरात लॉन्च करण्यात येईल. ‘Shoelace’  अॅप अॅन्ड्राईड आणि आयओएसवर सिस्टिमवर चालणार आहे.