Home ताज्या बातम्या खरिपाचा सोयाबीन पिकविम्यासाठी शेकडो शेतकर्यांचे दिंद्रुडात अमरण उपोषण

खरिपाचा सोयाबीन पिकविम्यासाठी शेकडो शेतकर्यांचे दिंद्रुडात अमरण उपोषण

माजलगाव : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड व नित्रूड मंडळातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन विमा कंपनी च्या गलथान कारभारामुळे व अद्याप पर्यत पिकविमा वाटप न केल्याने दिंद्रुड बसस्थानक येथे अमरण उपोषण सुरू केले आहे.
सततच्या दुष्काळ मुळे वैतागल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने सोयाबीन विमा भरला होता गतवर्षी पाऊस कमी झाल्याने सोयाबीन सह उत्पन्नला मोठा फटका बसला उत्पन्न कमी झाले मात्र अद्याप पर्यंत दिंद्रुड व नित्रुड मंडळातील एकाही शेतकऱ्यांला पिक विमा न मिळाल्याने दिंद्रुड येथील बाजार तळावर काल सकाळ पासून उपोषण सुरु केले असुन प्रशासन जो पर्यंत उपोषणची दखल घेत बँकेतील खात्यावर पैसे वर्ग करत नाही तोपर्यंत उपोषण न सोडण्याच्या पावित्र्यात शेकडो शेतकरी उपोषणस्थळी बसून आहेत , दरम्यान माजलगाव कृषी विभागाने उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पिक विमा लवकरच बँकेत वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती सदर उपोषणकर्त्यांना दिली परंतु अधिकृत लेखी आश्वासन मिळेपर्यंत उपोषण न सोडण्याच्या पावित्र्यात शेतकरी आहेत.बातमी लिहिण्या पर्यंत कुठल्याही प्रशासकीय अधिकार्याने उपोषणकर्त्यांची भेट न घेतल्याने दिंद्रुड पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत उपोषण सुरू ठेवले होते.

चौकट
उपोषण स्थळी माजी राज्य मंत्री प्रकाश सोळंके यांनी भेट देत माझे पिक विमा कंपनी शी बोलणे झाले असुन पिक विमा प्रति हेक्टरी २६,६६९ रु मंजुर झाल्याचे सांगत उपोषण सोडण्याचे अवाहन केले मात्र अधिकृत लेखी आश्वासन मिळे पर्यंत उपोषण न सोडण्याच्या भूमिकेवर उपोषणकर्ते ठाम होते.