सूर्याचा एक अद्भूत फोटो सध्या सोशल मीडियात सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. हा फोटो अंतराळातून घेण्यात आलाय. म्हणूनच पृथ्वीवरून दिसणाऱ्या सूर्यापेक्षा हा सूर्य फार वेगळा आणि आकर्षक दिसतो आहे. एक तर सूर्याचा हा विशाल फोटो अद्भूत आहेच, सोबतच या फोटोची खासियत म्हणजे सूर्याजवळून जाणारं इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. हा फोटो याचा पुरावा आहे की, आपण सूर्याच्या किती जवळ पोहोचलो आहोत.हा फोटो डॉ. करन जानी यांनी त्यांच्या ऑफिशिअल ट्विटर हॅंडलवर शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की, ‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन सूर्याच्या समोरून जाताना. अद्भूत फोटो! करन हे एक वैज्ञानिक आणि ब्लॅक होल एस्ट्रोफिजिसिस्ट आहेत. हा फोटो बघून लोकांना एक वेगळाच अनुभव मिळाला आहे. त्यामुळे हा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. १४ जुलैला हा फोटो शेअर करण्यात आला आहे.
- Advertisement -