Home बातम्या मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर

मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर

अलिबाग,जि. रायगड :  मा.मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याकडून मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर झाला असून तो पुढीलप्रमाणे आहे.  प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी सोमवार दि.15 जुलै. 2019  दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी सोमवार दि.15 जुलै ते मंगळवार 30 जुलै. 2019   विशेष मोहिमेचे दिनांक (Special Compaign) शनिवार दि. 20 जुलै 2019 रविवार दि.21 जुलै 2019  शनिवार दि.27 जुलै 2019 रविवार दि.28 जुलै 2019 पर्यवेक्षक/सहा. मतदार नोंदणी अधिकारी/मतदार नोंदणी अधिकारीद्वारा तपासणी सोमवार दि.05 ऑगस्ट 2019 पर्यंत.  दावे व हरकती निकाली काढणे मंगळवार दि.13 ऑगस्ट 2019 पर्यंत.  उपजिल्हा निवडणूक अधिकारी/जिल्हा निवडणूक अधिकारी/मतदार यादी निरीक्षक यांचेद्वारा मतदार यादीची विशेष तपासणी, डाटाबेसचे अद्यावतीकरण, पुरवणी याद्यांची छपाई इत्यादी शुक्रवार दि.16 ऑगस्ट 2019 पर्यंत.  अंतिम मतदार यादी प्रसिध्दी  सोमवार दि.19 ऑगस्ट 2019 रोजी असणार आहे. असे मतदार नोंदणी अधिकारी  अलिबाग विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी, अलिबाग यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.