Online News पोलीस टाइम्स : परवेज शेख
पुणे, दि. ४ जून : पुण्यातील गुरुवार पेठेतील सराईत वाहन चोरास अटक करून त्याच्याकडून ५ अॅक्टिव्हा मोपेड खडक पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्याच्यावर खडक, विश्रामबाग, दत्तवाडी, कोथरूड, लष्कर, वाकड इ. पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरी व वाहन चोरीचे असे एकूण १२ गुन्हे दाखल आहेत.


अभिषेक उर्फ पप्पू शरद पवार (वय-३३ वर्षे, रा. ७९८ गुरुवार पेठ, शेळके क्लासजवळ, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाहन चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या दृष्टीकोनातून खडक पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करीत असताना पोलीस अंमलदार समीर माळवदकर व फहीम सैय्यद यांना बातमी मिळाली की, शुक्रवार पेठेतील सुभाषनगर येथील अॅक्टिव्हा गाडी चोरलेला आरोपी अभिषेक पवार हा घोरपडे पेठेतील सिंहगड गॅरेज चौकात थांबलेला आहे. त्या बातमीच्या अनुषंगाने खडक पोलिसांनी तेथे जाऊन आरोपीस पकडले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने ५ अॅक्टिव्हा गाड्या चोरल्या असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या गाड्या धोबीघाट, कॅनॉल, स्वारगेट येथून जप्त केल्या आहेत. त्याच्या ताब्यातून १,७५,०००/- रु. किमतीच्या एकूण ५ अॅक्टिव्हा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. आरोपी अभिषेक पवारविरुद्ध खडक पोलीस स्टेशनमध्ये ४ व समर्थ पोलीस स्टेशनमध्ये १ असे एकूण ५ अॅक्टिव्हा चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

वरील कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, परिमंडळ-१ च्या पोलीस उप आयुक्त डॉ. प्रियंका नारनवरे व फरासखाना विभागाचे सहा. पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गाडे, तपास पथकाचे प्रभारी पोलीस उप निरीक्षक राहुल खंडाळे, सह. प्रभारी पोलीस उप निरीक्षक विक्रम मिसाळ, पोलीस अंमलदार फहीम सैय्यद, संदीप पाटील, समीर माळवदकर, बंटी कांबळे, राहुल मोरे, रवी लोखंडे, हिम्मत होळकर, अजिज बेग, सागर केकाण, अमेय रसाळ, अनिकेत बाबर यांनी केली आहे.