Home ताज्या बातम्या Mumbai crime : मुंबईत अमली पदार्थांची तस्करी; महिलेला अटक

Mumbai crime : मुंबईत अमली पदार्थांची तस्करी; महिलेला अटक

0
Mumbai crime : मुंबईत अमली पदार्थांची तस्करी; महिलेला अटक

म. टा. खास प्रतिनिधी,
मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा अमली पदार्थांच्या तस्करांविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली आहे. अंमली पदार्थविरोधी पथकाने दक्षिण मुंबईत हे पदार्थ पुरवठा करणाऱ्या एका महिलेला अटक केली. सरस्वती परमा नायडू उर्फ सरसा (५०) असे या महिलेचे नाव असून, ती घाऊक विक्रेती आहे. पोलिसांनी तिच्याकडून साडेतीन कोटी किमतीचे हेरॉइन हस्तगत केले आहे.

दक्षिण मुंबईतील किरकोळ विक्रेत्यांना एक महिला पुरवठा करीत असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाच्या वरळी युनिटला मिळाली. प्रभारी पोलिस निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने या महिलेच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली. सरस्वती नायडू अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी काळबादेवी येथे येणार असल्याचे समजल्याने पोलिसांनी सापळा रचून या ठिकाणी तिला ताब्यात घेतले. तिच्याकडील बॅगची झडती घेतली असता, यामध्ये एक किलो हेरॉइन सापडले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली.

मोठ्या साखळीचा भाग?

ही महिला अनेक दिवसांपासून दक्षिण मुंबईतील किरकोळ विक्रेत्यांना पुरवठा करते. यामागे मोठी साखळी सक्रिय असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, त्यादृष्टीने या महिलेकडे चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

Source link