Home मनोरंजन एकमेकांना स्पर्श ही नकरता कसे शूट केले जातात चित्रपटातील इंटिमेट सीन?

एकमेकांना स्पर्श ही नकरता कसे शूट केले जातात चित्रपटातील इंटिमेट सीन?

0
एकमेकांना स्पर्श ही नकरता कसे शूट केले जातात चित्रपटातील इंटिमेट सीन?

[ad_1]

मुंबई– काही वर्षांपूर्वीचे चित्रपट पाहिले तर त्यात इंटिमेट सीन दाखवण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागत नसे. खोलीत अंधार होताच एखाद्या फुलावर किंवा झुंबरावर कॅमेराचा फोकस ठेवत. त्यावरून प्रेक्षकांना स्पष्ट होई की, हा इंटिमेट सीन होता. पण सध्याच्या काळात अगदी सहजपणे हे सीन चित्रित केले जातात. अभिनेता आणि अभिनेत्री एकमेकांना किस करताना दिसतात आणि प्रेक्षकांना त्या गोष्टी खऱ्या वाटतात. परंतु, खरंच त्यांनी एकमेकांना किस केलं असेल का याबाबत अनेक प्रेक्षक साशंक असतात. प्रेक्षकांच्या अशाच काही प्रश्नांची उत्तरं आम्ही देणार आहोत.

‘द फॅमिली मॅन ३’ची तयारी सुरू, चीनसोबत लढताना दिसणार मनोज बाजपेयी?

अनेक अभिनेत्रींची मोठ्या पडद्यावर किसिंग सीन द्यायला काहीच हरकत नसते. परंतु, काही अभिनेत्री चित्रपटात किसिंग सीन द्यायला नकार देतात. अशावेळी त्यांची मनधरणी केली जाते. काही वेळेस अभिनेत्री तयार होतात पण जेव्हा त्या त्यांच्या निर्णयावर ठाम राहतात तेव्हा मात्र पर्यायी मार्ग अवलंबला जातो. अशावेळी क्रोमाचा वापर केला जातो. क्रोमा म्हणजे निळ्या किंवा हिरव्या रंगाचा पडदा. कलाकारांच्या मध्ये दुधी किंवा एखादी हिरव्या रंगाची भाजी ठेवली जाते. कलाकार दुधीला किस करतात आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने ते दोघे एकमेकांना किस करत आहेत असं दाखवलं जातं. कधीकधी फक्त इंटिमेट सीन करत असायचा भास निर्माण केला जातो. कलाकारांना एका विशिष्ट अँगलला उभं केल्याने प्रेक्षकांना कलाकार इंटिमेट सीन करत असल्याचा भास होतो.

जेव्हा कलाकार एकमेकांच्या जवळ असतात तेव्हा त्यांच्यात अशी एखादी वस्तू ठेवली जाते ज्यामुळे त्यांचं शरीर एकमेकांना स्पर्श करू शकणार नाहीकधीकधी कलाकारांमध्ये हवा भरलेली उशी ठेवण्यात येते. अभिनेत्रीसाठी पुशअप्स पॅड्सचा वापर केला जातो. जेव्हा अभिनेत्रीची पाठ पूर्णपणे उघडी दाखवण्यात येते तेव्हा अभिनेत्रीसाठी सिलिकॉन पॅड्सचा वापर केला जातो. याहूनही महत्वाची असते परवानगी. असे सीन चित्रित करण्यापूर्वी कलाकारांची परवानगी घेण्यात येते. शिवाय सीन चित्रित करताना कमीत कमी व्यक्ती त्याठिकाणी हजर असतात. दिग्दर्शक, कॅमेरामन आणि काही गरजेच्या व्यक्ती तिथे उपस्थित असतात. काही वेळेस तर दिग्दर्शकही बाहेर निघून जातात आणि कॅमेरावरील सीन पाहून बदल सांगतात.

हो …म्हणून मीच घरातले कॅमेरे बंद केले होते; करणच्या आरोपांवर निशाचा धक्कादायक खुलासा

[ad_2]

Source link