हायलाइट्स:
- नेहा कक्करचा आज वाढदिवस
- ‘इंडियन आयडल २’ मधून नेहाने मिळवली लोकप्रियता
- २४ ऑक्टोबर २०२० साली नेहा अडकली विवाहबंधनात
…म्हणून अदिती पोहनकर ठरली २०२० मध्ये महाराष्ट्रातली सर्वाधिक आकर्षक महिला
यागोष्टीचा खुलासा नेहाचा भाऊ टोनी कक्करने केला होता. नेहा आणि तिची बहीण सोनू कक्कर ते लहान असताना भजनी मंडळांमध्ये गाणी गात असत. त्यातून त्यांना जे पैसे मिळत त्यावर त्यांचं घर चालत असे. त्यानंतर नेहाने ‘इंडियन आयडल २’ मध्ये स्पर्धक म्हणून हजेरी लावली. ‘इंडियन आयडल २’ नंतर नेहाचं नशीब उजळलं. ती सीजनची विजेता तर बनू शकली नाही. परंतु, तिच्या आवाजामुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. नेहाची बहीण सोनू तिची मेन्टॉर होती. तिने नेहाला नेहमीच योग्य मार्ग दाखवला.
परंतु, नेहाच्या घरची परिस्थिती जरा बेताचीच होती. टोनीने सांगितल्याप्रमाणे, नेहाच्या आई- वडिलांना तिसऱ्या बाळाला जन्म द्यायचा नव्हता. परंतु, आठ आठवडे उलटून गेल्यावर गर्भपात करणं शक्य नसल्याने त्यांनी नेहाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. नेहादेखील सुरेल गळ्याची देणगी घेऊन आली होती. ती देखील ने आपल्या बहिणीसोबत गाणी गायची.. भजनं गाऊन त्यांनी आर्थिक परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला. २००८ साली नेहाने तिचा पहिला अल्बम प्रदर्शित केला. नेहाने ऑक्टोबर २०२० मध्ये रोहनप्रीत सिंहसोबत लग्नगाठ बांधली आहे.
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल