Home मनोरंजन वेल डन बेबी

वेल डन बेबी

0
वेल डन बेबी

[ad_1]

राज्याच्या, देशाच्या सीमा ओलांडून मराठी माणूस जगभर पोहोचला. विविध देशांमध्ये स्थिरावला. या स्थलांतरात संबंधित देशांमध्येही त्याला मानसिक, भावनिक आणि इतर आव्हानांचा सामना करावा लागला. त्या देशात वास्तव्य करत असताना त्याची मातीशी असणारी नाळ मात्र सुटली नाही. ‘वेल डन बेबी’ अशीच एका अनिवासी मराठी दाम्पत्याची गोष्ट सांगतो. बदलत्या काळात सुखसोविधांयुक्त जगात वावरत असताना, स्वत:ची ‘स्पेस’ शोधण्यासाठी सुरू असलेला झगडा दाखवतो. मातृत्व आणि पालकत्वाच्या संकल्पनांची आजच्या पिढीच्या दृष्टिकोनातून केलेली मांडणी करतो. अर्थात हा सारा प्रकार फार काही नवं सांगत नसल्यामुळे त्याची मांडणी ‘स्टिरिओटाइप’ होते आणि ‘वेल डन बेबी’चा अनुभव ‘वेल डन’ नव्हे तर ‘सो-सो बेबी’ असाच ठरतो.

लंडनमध्ये राहणारी मीरा () आणि आदित्य () यांची ही गोष्ट आहे. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या मीरा आणि आदित्यच्या वैवाहिक आयुष्यात जोरदार खटके उडू लागतात. कुटुंबियांचे प्रयत्न, समुपदेशकाचे ‘डोस’ याचा काहीही उपयोग होत नाही आणि गाडी घटस्फोटापर्यंत पोहोचते. मात्र, याच काळात या दोघांच्या जीवनात एका तिसऱ्याची ‘एंट्री’ होण्याची चाहूल लागते. त्यानंतर या दोघांचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. मीराच्या आईसह () आदित्यचे कुटुंबीयही यामुळे आनंदित होतात. मात्र, ही नवी जबाबदारी स्वीकारण्यासाठी मीरा आणि आदित्य खरंच तयार असतात का? कोणत्या भावनिक आव्हानांना ते तोंड देत असतात? हा मानसिक गुंता ते कसा सोडवतात? या प्रश्नांच्या उत्तरासाठी ‘वेल डन बेबी’ हा सिनेमा पाहायला हवा.

सिनेमाची कथा अतिशय सरळमार्गी आणि कोणतेही ‘ट्विस्ट’ नसणारी आहे. मुख्य कथानकाला जोडून येणारी अन्य उपकथानकेही फारशी नाहीत. मर्यादित म्हणजे खरं तर तीनच मुख्य व्यक्तिरेखांभोवती ही गोष्ट फिरते. आशय आणि विषयालाही विस्तारण्यासाठी फारसा वाव नाही. आहे त्या ‘पीच’वर खेळायचं म्हटल्यावर सिनेमाची पटकथा आणि संवाद आकर्षक आणि काहीसे खुमासदार हवे होते. मात्र, ‘वेल डन बेबी’मध्ये या साऱ्याचाच अभाव जाणवत राहतो. दोन व्यक्तिरेखांच्या खासगी आयुष्यातील खासगी प्रश्न असं आपण पाहत राहतो. त्यांच्या आयुष्याशी, त्यांच्या भावनांशी प्रेक्षक एकरूप होत नाही. कथा फुलविण्यासाठी मीराच्या आईच्या विक्षिप्तपणाचे काही विनोदी प्रसंग, काही गाणी असं पूरक काम केलं जातं. अर्थात असं सारं असूनही सिनेमाचा प्रभाव मर्यादित राहतो.

पाहा ट्रेलर:

पुष्कर जोग आणि अमृता खानविलकर आपापल्या भूमिकांना योग्य न्याय देतात. आजच्या काळात करिअरच्या मागे लागलेल्या दाम्पत्यांची विविध आधारावर होणारी घुसमट हा विचार लेखक-दिग्दर्शक करताना दिसतो. परदेशस्थ मराठी कुटुंबांचे एका विशिष्ट कोनातून दर्शनही घडवतो. अर्थात हे विषय समकालीन माध्यमांतून वारंवार येत असल्यामुळे त्यात नवं असं काही राहत नाही. ‘वेल डन बेबी’ एकदा पाहण्यासारखा नक्की आहे. मात्र, तो काही वेगळे दाखवत नाही हे सत्यदेखील उरतच.

निर्माते : पुष्कर जोग, मोहन नादार

दिग्दर्शक : प्रियांका तन्वर

पटकथा-संवाद : मर्मबंध गव्हाणे

कलाकार : पुष्कर जोग, अमृता खानविलकर, वंदना गुप्ते, नेहा शितोळे

ओटीटी : अॅमेझॉन प्राइम

दर्जा : अडीच स्टार

[ad_2]

Source link