Home मनोरंजन ओह माय घोस्ट

ओह माय घोस्ट

0
ओह माय घोस्ट

[ad_1]

‘झपाटलेला’, ‘पछाडलेला’, ‘अ पेइंग घोस्ट’ हे हॉरर कॉमेडी चित्रपट लोकप्रिय ठरले. या चित्रपटांचे दाखले देण्याचं कारण म्हणजे, हे चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांची ‘ओह माय घोस्ट’ पाहून काहीशी निराशा होण्याची शक्यता आहे. चित्रपटाच्या गोष्टीचा जीव आहे छोटा. त्यात तांब्याभर दुधात कळशीभर पाणी ओतल्याची गत या चित्रपटाची झाली आहे. मूळ कथानक पडद्यावर मांडताना पटकथा चहूबाजूंनी फुलणं आणि दिग्दर्शकीय संस्कार याच गोष्टींची उणीव असल्यानं हा चित्रपट रटाळ झाला आहे.

ही गोष्ट आहे बेरोजगार असलेल्या ‘जग्गू’ () या मुलाची. अनाथ असलेला जग्गू भाड्याच्या घरात राहत असतो. त्याच्यासमोर आर्थिक संकट असतं. आपल्या या जीवनाला कंटाळून तो वारंवार आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. त्याचे प्रयत्न अयशस्वी ठरत असतात. शेवटी तो विष खाऊन आत्महत्या करायचं ठरवतो; पण तितक्यात त्याचा घरमालक तिथं पोहोचतो आणि त्याला रुग्णालयात दाखल करतो. इथं कथानकात टर्निंग पॉइंट आहे. रुग्णालयात जग्गूवर उपचार सुरू असताना त्याला एक लहान मुलगी दिसते; जी केवळ त्यालाच दिसत असते आणि तिचा आवाज ऐकू येत असतो. या प्रकाराला घाबरून जग्गू रुग्णालयातून पळ काढतो आणि आपल्या घरी येतो. घरात चार जण असतात. एक वयस्कर आजोबा (कुरुष देबू), जग्गूच्या वडिलांच्या वयाचे एक गृहस्थ (), आईच्या वयाची गृहिणी (सोमेश्वरी) आणि रुग्णालयात जग्गूला दिसलेली ती लहान मुलगी (अपूर्वा देशपांडे). या चौघांना घरात पाहून जग्गू अचंबित होतो आणि घाबरतोही. हे चौघंही आपण भूत असल्याचं त्याला सांगतात. आमच्यापासून मुक्ती हवी असेल; तर आमच्या प्रत्येकाची अपूर्ण राहिलेली एक-एक इच्छा पूर्ण करायची. आता इथून पुढं काय घडतं? ती चार भुतं कोण असतात? त्यांच्या इच्छा कोणत्या? त्या जग्गू पूर्ण करतो का? जग्गूच्या आयुष्यात पुढं काय बदल घडतात? याची उत्तरं मिळवण्यासाठी चित्रपट पाहावा लागेल. इच्छापूर्तीचा हा खेळ मनोरंजनात सुमार ठरतो.

चित्रपटातले व्हीएफएक्स आणि त्याच्याशी निगडित तांत्रिक बाजू समाधानकारक आहेत. दिग्दर्शकाची चित्रपटावरची पकडच पक्की नसल्यानं तो सुरुवातीपासूनच भरकटलेला दिसतो. प्रथमेश परबनं त्याची भूमिका चांगली साकारली आहे. इतर सर्वांनीही त्यांची कामं चांगली केली आहेत. वसीम खान यांचं छायांकन उजवं. रोहित राऊतचं संगीत आणि गाणीही चांगली आहेत. एकंदर, चित्रपटाची गोष्ट काही शिकवण देणारी असला; तरी मांडणी फसल्यानं ही कलाकृती रंजक झालेली नाही.

निर्मिती ः सना खान, रोहनदीप सिंग

दिग्दर्शक छायांकन ः वसीम खान

लेखन ः मोहसीन चावडा

संवाद ः निखिल लोहे

कलाकार ः प्रथमेश परब, , पंकज विष्णू, कुरुष देबू, अपूर्वा देशपांडे, सोमेश्वरी

संकलन ः प्राची पाथरे

दर्जा ः दोन स्टार

[ad_2]

Source link