[ad_1]
हायलाइट्स:
- लाइव्ह सेशनमध्ये युझरने विचारला प्रश्न
- उत्तर देत विद्याने केली युझरची बोलती बंद
- विद्याच्या ‘शेरनीसाठी चाहते उत्सुक
हिंदी मालिकेत काम करण्याचा अनुभव कसा आहे? मयुरी देशमुख म्हणते….
विद्याने इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी लाइव्ह सेशन आयोजित केलं होतं. या सेशनमध्ये युझर्स विद्याला प्रश्न विचारू शकत होते. एका युझरने विद्याला तिचा आवडता अभिनेता कोण असं विचारलं आणि सलमान की एसआरके असे पर्याय दिले. त्यावर विद्या स्टाइलने उत्तर देत अभिनेत्रीने माय एसआरके लिहत आपल्या पतीसोबतचा फोटो शेअर केला आणि सोबत एक लाल हार्टवाला इमोजीदेखील लिहिला. विद्याच्या या उत्तराचा अर्थ अनेक चाहत्यांना कळाला नाही. परंतु, विद्याच्या या उत्तराचा रोख तिच्या पतीकडे होता.
विद्याने आपल्या पतीसाठी प्रेम व्यक्त करत एसआरके लिहिलं. या एसआरकेचा अर्थ सिद्धार्थ रॉय कपूर असा होतो. विद्याने पतीला हिरो बनवत तोच तिचा आवडता अभिनेता असल्याचं म्हटलं. एका दुसऱ्या युझरने विद्याच्या रिलेशनशिपचं स्टेटस विचारत लिहिलं, ‘तुम्ही कमिटेड आहात का?’ त्यावर पुन्हा एकदा आपल्या पतीसोबतचा सुंदर फोटो शेअर करत विद्याने लिहिलं, ‘मला तरी तसंच वाटतंय.’ विद्याच्या ‘शेरनीची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येत आहे.
कोण खरं कोण खोट? रियाच्या आरोपांवर नितीश भारद्वाज यांचा खुलासा; म्हणाले सुशांत आणि साराला कधीही…
[ad_2]
Source link